गगनबावडा | कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने २८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर गगनबावडा मार्गावर असळज, खोकुर्ले, मांडुकली, किरवे येथे पाणी आल्याने हा रस्ता वाहतूकीसाठी पूर्णत बंद करण्यात आला आहे. रस्त्यावर सध्या ३ फूट पाणी असून पाण्याचा जोर सतत वाढत असल्याचे दिसत आहे. यामुळे कोकणात जाणारी वाहतूक पूर्णत ठप्प झाली आहे.
पश्चिम भाग आणि धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने नद्यांना पूर आल्याची स्थिती असून अनेक नद्या पात्राबाहेर आल्या आहेत. तालुक्यातील दळणवळण सेवाही खंडीत झाल्याने नागरिकांच्यात पुन्हा मागील वर्षी आलेल्या महापूराच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.