Categories: बातम्या

अखेर पतंग काटला… गोकुळमध्ये सत्तांतर; महाडिकांच्या वर्चस्वाला धक्का

कोल्हापूर | संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या गोकुळ निकडणुकीत अखेर सत्ताधाऱ्यांना खाली खेचण्यात विरोधी आघाडीला यश आले आहे. विरोधकांनी महाडिकांची सत्ता उलथवली असून १७-४ अशा फरकाने विजय मिळवला आहे. सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ गटाच्या राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने सत्ता काबीज करत गोकुळवर ताबा मिळवला आहे. त्यामुळे गोकुळं आमचंच अशा अविर्भात वावरणाऱ्या सत्ताधारी गटाला चांगलाच धक्का बसला आहे. 

अंतिम निकाल :
राजर्षी शाहू शेतकरी आघाडी – विरोधी गट – सर्वसाधारण गट – अरूण डोंगळे – 1980, अभिजित तायशेटे – 1972, अजित नरके – 1972, नविद मुश्रीफ – 1959, शशिकांत पाटील-चुयेकर – 1923, विश्‍वास पाटील – 1912, किसन चौगले – 1889, रणजित कृष्णराव पाटील – 1872, नंदकुमार ढेंगे – 1867, कर्णसिंह गायकवाड – 1848, बाबासाहेब चौगले – 1814, प्रकाश पाटील – 1709, संभाजी पाटील – 1721, महिला गट – अंजना रेडेकर – 1872, भटक्‍या विमुक्त जाती-जमाती – बयाजी शेळके, इतर मागासवर्गीय – अमर पाटील, अनुसुचित जाती- डॉ. सुजित मिणचेकर.
राजर्षी शाहू आघाडी – सत्ताधारी गट – अंबरिशसिंह घाटगे – 1803, बाळासाहेब खाडे – 1715, चेतन नरके – 1762, शौमिका महाडिक – 1769.

पहिल्या फेरीत विरोधी गटातील तब्बल चौदा उमेदवार आघाडीवर होते. दुसऱ्या फेरीत हा आकडा नऊवर आला होता. तिसऱ्या फेरीत पुन्हा विरोधी गटाने मुसंडी मारल्याने १२ उमेदवार आघाडीवर होते. चौथ्या फेरीअखेर १३ तर तर पाचव्या फेरीअखेर हेच लीड कायम होते. सहावी फेरी संपली तेव्हा विरोधी आघाडीचे १४ उमेदवार आघाडीवर होते. तर सातव्या आणि आठव्या फेरी अखेर १३ उमेदवार आघाडीवर राहिले.

Team Lokshahi News