Categories: Featured

ठाकरे सरकारच्या ‘शिवथाळी’ वर राजू शेट्टींची खरमरीत टीका, म्हणाले…

कोल्हापूर।४ जानेवारी । ठाकरे सरकारच्या शिवथाळी योजनेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जोरदार टीका केलीय. शिवारात पिकवणाऱ्या शेतकऱ्याकडे पहिलं बघा. जर शेतकऱ्यांचं शिवारच मोकळं पडलं तर शिवथाळीमध्ये आणणार कोठून? शेवटी आयातच करावं लागेल, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवलाय.

दरम्यान ८ जानेवारीला बंद नियोजना बाबत आज कोल्हापूरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राजू शेट्टी यांनी माध्यमांशी संवाद साधला.

भारतीय किसान सभेच्या वतीने देशभरातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आणि सरसकट कर्जमाफीसाठी येत्या ८ जानेवारीला देशभर कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. या बंदमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी होणार असून बंद दरम्यान म्हणजेच ८ तारखेला शेतकऱ्यांची काय ताकत आहे, हे सरकारला समजेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

Team Lokshahi News