Categories: राजकीय

मुख्यमंत्री साहेब ‘या’ ११ प्रश्नांची उत्तरे द्या; अन्यथा जनआक्रोश यात्रा काढणार – राजू शेट्टींचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

कोल्हापूर।३१ जुलै। महाजनादेश यात्रा काढणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब खालील प्रश्नांची उत्तरे द्या अन्यथा तुमच्या महाजनादेश यात्रेपाठोपाठ राज्यात जनआक्रोश यात्रा काढणार असल्याच्या इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत.

 1. राज्यातील बिल्डराकडून वसूल केलेल्या १० हजार कोटींच्या ठेवी बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे जमा झाल्या. त्यातील किती पैसे तुम्ही खर्च केले? आणि त्यामधून कुणाचे कल्याण झाले. अजूनही बांधकाम कामगार किड्या मुंग्यांसारखे मरत आहेत. त्यासाठी तुमच्या सरकारने काय केले?
 2. पीक विम्यामध्ये झालेल्या गैरव्यवहाराबद्दल मी स्वतः दीड वर्षापुर्वी पुराव्यासहित माहिती आपल्याकडे दिली होती. संबधित विमा कंपनी व त्या कंपनीस सहकार्य करणार्‍या कृषि व महसूल विभागातील भ्रष्ट अधिकार्‍यांवर काय कारवाई केली, व असे शेतकर्‍यांचे पुन्हा नुकसान होऊ नये म्हणून काय दक्षता घेतली. आयआरडीए (इश्युरन्स रेग्युलेटरी अ‍ॅण्ड डेपलपमेंट अ‍ॅथोरटी) कडे किती शेतकर्‍यांनी तक्रारी केल्या व त्याचे पुढे काय झाले, याचा मुख्यमंत्री या नात्याने तुम्ही आढावा घेतला काय?
 3. आपले विश्वासू सहकारी पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र कृषि मूल्य आयोगाने उसाचा उत्पादन खर्च मागील वर्षाच्या (सन २०१६-१७) तुलनेत ३२ हजाराने कमी असल्याचा अहवाल केंद्र सरकारकडे दिलेला आहे. ते ऊस उत्पादक शेतकर्‍यांना सांगणार काय? तसेच मंत्री मंडळातील आपले सहकारी ना. सुभाष देशमुख, ना. तानाजी सावंत, ना. पंकजाताई मुंडे, ना. राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, यांनी ऊस उत्पादकांचे पैसे थकविले असले तरीसुध्दा फारसे मनावर घेऊ नका असे ऊस उत्पादकांना सांगणार आहात का?
 4. आपल्या सरकारमधील कर्तृत्वान कृषी खात्याने बोंड अळी पासून कापूस कसा वाचवावा याचा कानमंत्र शेतकर्‍यांना दिलेला नसला, तरी बोंड अळी पासून बचाव करण्यासाठी शेतकर्‍यांनी एसटीबीटी बियाण्यांचा वापर केल्यास ते पुरवण्यार्‍या कंपन्यांवर कारवाई न करता मोदी सरकारच्या आदेशावरून शेतकर्‍यांनाच तुरूंगात टाकले जाईल, कुणाची गय केली जाणार नाही असा सज्जड दम कापूस उत्पादकांना देणार आहात का?
 5. तूर, हरभरा, मगू उडीद कांद्याचे अनुदान ठिबकचे अनुदान इत्यादीसाठी अनुदान मिळाले नाही, तरीही तक्रार करू नका, साल्याओ…! असे सांगणार आहात काय? तसेच कर्जमाफीच्या यादी नाव असले तरीसुध्दा थकीत कर्जापोटी बँकानी कर्जवसुली केली अथवा नवीन कर्ज दिले नाही तरीही शेतकर्‍यांनी तक्रार करू नये, कारण सरकार आता झिरो बजेट शेतीचा पुरस्कार करत असल्याने आता कुणीही तक्रार करू नये, असे सांगणार आहात का?
 6. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना साखर कारखान्यांतील आर्थिक घोटाळे व सिंचन घोटाळे करणार्‍यांच्या विरोधातील गाडीभर पुरावे तुम्ही तत्कालीन मुख्यमंत्र्यांना दिले होते. त्यांनी काहीच कारवाई केली नाही, त्यात तुमचे सरकार आल्यास त्या सर्वांना तुम्ही तुरुंगात टाकणार होता, त्या ऐवजी धोरणात बदल करून त्यातील बहुसंख्यांना भाजपात प्रवेश देऊन उरलेल्यांना इनकम टॅक्स व ईडी या आपल्या दोन कार्यकर्त्यांची भिती दाखवून त्यांना भेदरलेल्या अवस्थेत ठेवणे हे राज्याच्या प्रगतीच्या दृष्टीने आवश्यक बाब आहे. हे जनतेला पटवून सांगणार आहात काय?
 7. धनगर समाजाने एस.टी. दाखला मिळावा म्हणून बारामतीला उपोषण केले होते. आपण स्वतः बारामतीला जाऊन सरकार बदलल्यास पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर सामाजाला एसटीचे दाखले देण्याचा निर्णय घेऊ असे आश्वासन देऊन उपोषण सोडवले व आता आचारसंहिता एक महिन्यात लागणार असल्यामुळे धनगरांना एस.टी. चे सर्व लाभ व तरतूद केलेले १००० कोटी रूपये सर्व खर्च करून दाखवू हे पटवून देणार आहात का?
 8. लिंगायत धर्मातील बहुसंख्य जातींना उदा(परिट, कुंभार, गुरव, जंगम, लोहार, सुतार, माळी, कोष्टी, वाणी इ.) ओबीसीचा लाभ मिळत असताना, पाटील, देशमुख यासारख्या वतनदार लिंगायत धर्मातील लोकांना ओबीसीचे आरक्षण देणे शक्य नाही, हे माहित असताना लिंगायत समाजास ओबीसीच्या सवलती देऊ, असे खोटे आश्वासन देऊन त्यांच्या स्वतंत्र धर्माच्या मागणीस भाजपा पाठिंबा देणार नाही, असे ठासून सांगणार आहात काय?
 9. महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांवर रोजगार देण्यासाठी ३५ लाख पदांची मेगाभरती करून सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न कायमस्वरूपी मिटवणार होता, पण सुशिक्षित बेरोजगारांनी अर्जच न केल्यामुळे ही मेगाभरती करता आली नाही, हे बेरोजगारांना पटवून देणार आहात का?
 10. राज्य सरकारने तात्पुरत्या स्वरूपामध्ये प्रशासकीय कामांमध्ये आऊटसोर्सिंग द्वारे रोजदांरी (कंत्राटी) पध्दतीने नोकर्‍या दिलेल्या आहेत. त्या कंत्राटदारांना दिली जाणारी शासनाकडून रक्कम व प्रत्यक्षात हातात पडणारी रक्कम यात जमीन आस्मनाचे अंतर असले तरी तुम्हाला दिलेल्या नोकर्‍या उपकार समजा व मुकाट्याने सहन करा असे डाटा ऑपरेटर, महावितरणचे वायरमन, ड्रायव्हर, सफाई कामगार, इत्यादींना समजावून सांगणार आहात काय?
 11. गेल्या ४ वर्षापासून कृषि वीज पंपाच्या जोडण्या दिलेल्या नाहीत, तसेच महावितरण कंपनीचा भ्रष्टाचार लपविण्यासाठी शेतकर्‍यांनी विजेचा वापर न करताही त्यांच्या नावावर टाकलेली बिले दुरूस्त करून देतो असे वारंवार आश्वासन देऊनही तसेच १ रूपया १६ पैसे युनिट विजेचे दर निश्चित करण्याचा शासन निर्णय करूनही २ रूपये ५० पैसे पैक्षा जास्त दराने वीज बिलांची आकारणी करून शेतकर्‍यांना लुबाडण्याचे धोरण योग्यच आहे, हे शेतकर्‍यांना ठासून सांगणार आहात काय?
Tags: जनआक्रोश भाजप महाजनादेश यात्रा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटना
Rajendra Hankare

Recent Posts

 • बातम्या

१ डिसेंबरला शाळा सुरू होणार का? आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई | कोरोनाचा नवा विषाणू ओमिक्रॉनने सध्या संपूर्ण जगभरात दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे सर्व देशांनी पूर्वकाळजी घेत निर्बंध लावण्यास… Read More

November 29, 2021
 • नोकरी

ITI धारकांना सुवर्णसंधी; विद्युत विभागात 334 रिक्त पदांची भरती

पणजी | गोवा विद्युत विभाग येथे असिस्टंट लाइनमन/ वायरमन आणि लाइन हेल्पर पदांच्या एकूण 334 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.… Read More

November 29, 2021
 • नोकरी

उत्पादन शुल्क विभाग गोवा येथे 12 वी/पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी

पणजी | उत्पादन शुल्क विभाग गोवा अंतर्गत उत्पादन शुल्क निरीक्षक, उत्पादन शुल्क उपनिरीक्षक, कनिष्ठ लघुलेखक, सहायक उत्पादन शुल्क रक्षक पदांच्या 46 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार… Read More

November 28, 2021
 • नोकरी

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प येथे 138 रिक्त पदांची भरती, त्वरित अर्ज करा

गडचिरोली | एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली येथे उच्च माध्यमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक, अधीक्षक, महिला अधिक्षिका, पदव्युत्तर… Read More

November 28, 2021
 • नोकरी

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती सुरू, ‘असा’ करा अर्ज

मुंबई | सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) अंतर्गत विशेषज्ञ अधिकारी पदाच्या 115 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत… Read More

November 28, 2021
 • नोकरी

CDAC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 09 डिसेंबर पर्यंत ‘या’ ठिकाणी करा अर्ज

मुंबई | प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई (CDAC) मुंबई येथे प्रकल्प अभियंता आणि प्रकल्प व्यवस्थापक पदांच्या एकूण 111 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज… Read More

November 28, 2021
 • नोकरी

ITI धारकांना नोकरीची सुवर्णसंधी – 2070+ पदांसाठी भरती

पुणे | आयटीआय धारकांना नोकरीची चांगली संधी मिळत असून पुणे येथे मेकॅनिक मोटार वाहन / डिझेल मेकॅनिक / इलेक्ट्रिशियन / फिटर /… Read More

November 28, 2021
 • नोकरी

10 वी/ ITI, पदवीधर उत्तीर्णांना भारतीय तटरक्षक दलात नोकरीची संधी

मुंबई | भारतीय तटरक्षक दल अंतर्गत मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, फोर्क लिफ्ट ऑपरेटर, एमटी फिटर, फायरमन, इंजिन ड्रायव्हर, मल्टी टास्किंग स्टाफ, लस्कर पदांच्या एकूण 19… Read More

November 27, 2021
 • नोकरी

10 वी ते पदवी उत्तीर्णांना भारतीय हवाई दलात नोकरीची संधी

नवी दिल्ली | भारतीय हवाई दल अंतर्गत कमिशन्ड अधिकारी पदाच्या एकूण 317 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने… Read More

November 27, 2021
 • नोकरी

महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय अंतर्गत 413 रिक्त पदांची भरती

मुंबई | स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय येथे शहर समन्वयक, विभागीय तांत्रिक तज्ञ पदांच्या एकूण 413 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र… Read More

November 27, 2021