मुंबई।२९ डिसेंबर। महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी उद्या मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ठाकरे सरकारमध्ये राष्ट्रवादीचे जे मंत्री शपथ घेणार आहेत, त्या मंत्र्यांच्या यादीत राजू शेट्टी यांचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे.
ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा उद्या ३० डिसेंबर रोजी विस्तार होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजितदादा पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, अदिती तटकरे, जितेंद्र आव्हाड हे नेते मंत्रीपदाच्या यादीत आहेत. त्याचबरोबर मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादीला पाठिंबा दिलेले राजू शेट्टीही राष्ट्रवादीतर्फे मंत्री होणार आहेत. राजू शेट्टींची ओळख राष्ट्रीय पातळीवरील लढाऊ शेतकरी नेते म्हणून होत असून मागील भाजप सरकारमध्ये सामील असताना शेट्टी यांनी सरकार विरोधात एल्गार पुकारत सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना आपली खासदारकी मात्र गमवावी लागली होती. तरीदेखील शेतकरी मुद्दावरून राजू शेट्टी यांचे सुरू असलेले कार्य आणि कार्यकर्त्यांची ताकद मोठी आहे.
राष्ट्रवादीची शिक्कामोर्तब झालेली मंत्री पदाची यादी