Categories: Featured गुन्हे मनोरंजन

दिपीकाच्या आधारासाठी सरसावला रणवीर, एनसीबीला केली ‘ही’ विनंती..!

ड्रग्जप्रकरणी बॉलीवूडच्या अनेक बड्या कलाकारांची नावे समोर आली आहेत. या प्रकरणात एनसीबीने दिपीकालाही समन्स पाठवला आहे. उद्या २६ सप्टेंबरला दीपिका एनसीबीपुढे हजर राहणार आहे. तत्पूर्वी दिपीकाचा पती रणवीर सिंग याने चौकशीदरम्यान आपल्यालाही तिच्यासोबत हजर राहण्याची परवानगी मिळावी अशी विनंती एनसीबीला केली आहे.

‘PeepingMoon.com ’च्या वृत्तानुसार, दिपीकाला एन्जाइटी आणि पॅनिक अटॅक येतात. अशावेळी ती प्रचंड घाबरते़ अस्वस्थ होते, यामुळे चौकशी सुरु असताना मी हजर राहू शकत नाही. पण किमान दिपीकासोबत एनसीबीच्या कार्यालयाच्या आतपर्यंत येण्याची परवानगी मिळावी, असे रणवीरने आपल्या विनंती अर्जात म्हटले आहे. रणवीर सिंगच्या या विनंती अर्जावर एनसीबीने अद्याप कुठलाही निर्णय घेतला नसल्याचे कळते.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: bollywood actress bollywood drugs probe Deepika Padukone NCB एनसीबी ड्रग्ज रणवीर सिंग