Categories: Featured

Corona : जाणून घ्या काळे मनुके खाण्याचे फायदे

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वच जण आपल्या आरोग्याची काळजी घेत आहेत. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी होमिओपॅथिपासून अॅलिओपॅथीपर्यंत अनेक औषधांची सध्या मागणी वाढली आहे. यातच प्राचीन असलेला मात्र नव्याने माहिती झालेला ‘आयुष काढा’ शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी प्रभावी ठरत आहे. एकूणच कोरोनासंक्रमणाच्या काळात आयुर्वेद खुप महत्वाची भूमिका बजावत असल्याचे दिसत आहेत. 

 आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे काळे मनुके खाणे हे देखील आरोग्यास खूप फायदेशिर आहे. आयुष काढ्यात दालचिनी, सुंठ, काळी मिरी, तुळशीपत्र यांच्याबरोबर काळे मनुके हा देखील महत्वाचा घटक आहे. विशेष म्हणजे इतर सर्व पदार्थ उष्ण असून यातील काळे मनुके हा एकमेव घटक आहे जो यातील उष्ण प्रभाव कमी करून काढ्याला शीतलता प्रदान करतो. 

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फॉर्मेशननुसार, काळ्या मनुक्यांमध्ये मॅग्निशिअमचे प्रमाण भरपूर आहे. या घटकामुळे हाडे कमकुवत होण्याचा त्रास कमी करण्यास मदत मिळू शकते. हाडांना मजबूत करण्यासाठी मनुके सकाळी अनोशापोटी खाणं उत्तम ठरतं. यामध्ये फायबरसोबत कॅल्शिअम आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स गुणधर्म आढळून येतात. ज्यामुळे शरीरात हाडांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते

  1. दुधासोबत काळ्या मनुक्यांचे सेवन केल्यानं आरोग्यास प्रचंड प्रमाणात सकारात्मक लाभ मिळतात.
  2. काळा मनुका हा मधुर, शीतल, हृदयासाठी हितकारक, श्रमनाशक, रक्तवर्धक असतो. मनुक्यामधील लोह, पोटॅशियम आणि फायबर रक्तदाब कमी करुन पचन व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करतात.
  3. रात्री पाण्यात भिजत ठेवलेला मनुका सकाळी खाल्ल्यास रक्ताच्या कमतरता संदर्भातील अॅनिमिया आजार काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते.
  4. काळ्या मनुक्यामधील ब जीवनसत्त्व, आर्यन आणि कॉपर रक्त वाढवण्यास मदत करते.
  5. मनुक्यामध्ये ग्लुकोझ आणि फ्रुकट्रोस असते  जे शरीरातील उर्जा वाढवते. वजन वाढवताना कोलेस्ट्रॉल दूर ठेवते. त्यामुळे वजन वाढविण्यासाठी काळे मनुके अधिक उपयुक्त आहेत.
  6. झोपण्याच्या एक तास आधी उकळेल्या दुधामधून मनुक्यांचे सेवन केल्यास पोटाशी संबंधित आजारांवर मात मिळवता येते.
  7. मनुक्यामधील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करण्याची क्षमता असते. त्यामुळे ताप आल्यावर मनुके खावेत. ताप लवकर उतरण्यासाठी मनुक्याचे सेवन करणे उपयोगी ठरते.
  8. मनुक्यामध्ये बोरॉन नावाचा रासायनिक घटक असतो जो सांधेदुखीच्या त्रासापासून मुक्ती देण्यासाठी उपयुक्त ठरतो.
  9. काळ्या मनुक्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते, त्यामुळे काळे मनुके हृदयाच्या आरोग्यासाठी हितकारक समजले जातात.
  10. काळ्या मनुकांमध्ये लोह आणि पोटॅशियमचं प्रमाण अधिक असतं त्यामुळे हिमोग्लोबीन, नियमित येणारा थकवा यांसारख्या समस्या भेडसावत नाहीत.

महत्वाचे – काळ्या मनुका भिजवून खाल्ला तर तो शरीरासाठी लाभदायी आहे. मात्र नुसताच खाल्ल्यास शरीरातील उष्णता वाढते.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: benefits of eating black dates benefits of eating figs benefits of eating salty foods benefits of eating soaked almonds benefits of eating walnuts Black currants in english harms of eating currants price of black currants अक्रोड खाण्याचे फायदे अंजीर खाण्याचे फायदे काळे खजूर खाण्याचे फायदे काळे मनुके in english काळे मनुके किंमत खारीक खाण्याचे फायदे बदाम भिजवून खाण्याचे फायदे मनुका खाण्याचे नुकसान