Categories: Featured

बच्चू कडूंना कोरोनाची लागण; वाचा आत्तापर्यंत कोरोना झालेल्या मंत्री आणि लोकप्रतिनिधींची यादी

मुंबई | राज्यमंत्री बच्चू कडू यांची कोविड 19 टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली. यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याची कोरोनाच्या यादीत भर पडली आहे. “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करुन घ्यावी”, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

दरम्यान, बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील महावितरण मध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांची आज भेट घेतली होती.

आत्तापर्यंत कोरोनाची लागण झालेले महाविकास आघाडीतील मंत्री आणि विविध पक्षातील लोकप्रतिनिधींची यादी

जितेंद्र आव्हाड – राष्ट्रवादी
अस्लम शेख – काँग्रेस
अशोक चव्हाण – काँग्रेस
धनंजय मुंडे – राष्ट्रवादी
संजय बनसोडे – राष्ट्रवादी
अब्दुल सत्तर – शिवसेना
सुनील केदार – काँग्रेस
बाळासाहेब पाटील – राष्ट्रवादी
हसन मुश्रीफ- राष्ट्रवादी
प्राजक्त तनपुरे- राष्ट्रवादी

महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोना बाधित झालेले लोकप्रतिनिधी
मकरंद पाटील – राष्ट्रवादी
किशोर जोरगेवार – अपक्ष
ऋतुराज पाटील – काँग्रेस
प्रकाश सुर्वे – शिवसेना
पंकज भोयर – भाजप
माणिकराव कोकाटे – राष्ट्रवादी
मुक्ता टिळक – भाजप
वैभव नाईक शिवसेना
सुनील टिंगरे – राष्ट्रवादी
किशोर पाटील – शिवसेना
यशवंत माने – राष्ट्रवादी
मेघना बोर्डीकर – भाजप
सुरेश खाडे – भाजप
सुधीर गाडगीळ – भाजप
चंद्रकांत जाधव – काँग्रेस
रवी राणा – अपक्ष
अतुल बेनके – राष्ट्रवादी
प्रकाश आवाडे – अपक्ष
अभिमन्यू पवार – भाजप
माधव जळगावकर – काँग्रेस
कालिदास कोलंबकर – भाजप
महेश लांडगे – भाजप
मोहन हंबरडे – काँग्रेस
अमरनाथ राजूरकर – काँग्रेस
मंगेश चव्हाण – भाजप
गीता जैन 
सरोज अहिरे
विधान परिषद सदस्य
सदाभाऊ खोत – भाजप
सुजित सिंग ठाकूर – भाजप
गिरीश व्यास – भाजप
नरेंद्र दराडे – भाजप

Team Lokshahi News