Categories: Featured सामाजिक

पण नेमकं संचारबंदीच्या कालावधीमध्ये या लोकांमध्ये काय श्रद्धा जागृत झालीय देव जाणे, निश्चितच याच्यामागे काहीतरी संशयास्पद आहे… एका मुस्लीम बांधवाची ‘ही’ पोस्ट नक्की वाचा…

असं तर इतर वेळी मशिदी ओस पडलेल्या असतात फक्त शुक्रवार वगळता. ज्या मशिदीची क्षमता चारशे माणसे सामावण्याची आहे त्या मशिदीमध्ये इतर वेळी ३०-४० लोक असतात. फजरच्या नमाजच्या वेळेला तर दहा-बारा लोक मिळणे अवघड. ही मियाभाई ची अल्लाच्या प्रती असणाऱ्या श्रद्धेचे खरे आणि वास्तविक रूप. मी बर्‍याच वेळेला असे मत मांडले आहे कि एवढ्या मोठ्या मशिदी बांधण्यापेक्षा शाळा, अभ्यासिका, ग्रंथालय बांधा. जेणेकरून लोकांना फायदा होईल. मशिदी अगडबंब आणि बहुसंख्य मुसलमान दारिद्र्य रेषेखाली झोपडपट्टीत खितपत पडलेला असे टोकाचे विदारक चित्र आहे.

पण नेमकं संचारबंदीच्या कालावधीमध्ये या लोकांमध्ये काय श्रद्धा जागृत झाली आहे देव जाणे. अर्थात अशांची संख्या खूप कमी आहे हे एक त्याच्यातील आशादायक चित्र. संपूर्ण मिरजमध्ये साधारण दोनशे मशिदी असतील त्यातील ही एकमेव आज दुपारी उघडण्यात आली. मला स्वतःला मशिदीत जाऊन २० दिवस झाले असतील. माझं घर आणि मशिदीत एका भिंतीच अंतर आहे.

हाकेच्या अंतरावर असणारी पोलीस चौकी, भर मार्केटमध्ये असणारे स्थान तरीही ही मशीद उघडून नमाज पडायची केलेली आगळीक… निश्चितच याच्यामागे काहीतरी संशयास्पद आहे असे म्हणण्यास वाव आहे. या सर्व गोष्टीचा निषेध करावा तितका कमीच आहे. नमाज पडण्यासाठी ज्याच्या अंडर मध्ये नमाज पडला जातो आधी त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी केली पाहिजे, आणि असा आगाऊपणा करणाऱ्या सर्वांना जरब बसेल अशी कडक कायदेशीर कारवाई मस्जिदच्या इमामवरही झाली पाहिजे.

मोहम्मद पैगंबरांचा आदेश न पाळणारा, ज्या देशामध्ये राहतो त्या देशाच्या संविधाना प्रति आदर न बाळगणारा, कायद्याच्या प्रति आदर नसणारा माणूस हा तुमचा इमाम, तुमचा प्रमुख, तुमचा रहबर, तुमचा नेता होऊच शकत नाही, हे याठिकाणी सर्व मुस्लिम बांधवांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. #stayhome_staysafe

Team Lokshahi News