Categories: राजकीय

… असा झाला फडणवीसांच्या ‘पुन्हा येईन’ चा कार्यक्रम!

Tushar Gaikwad यांच्या फेसबुक वॉलवरून

प्रत्येक गोष्टीचा एक ठराविक काळ असतो, एकदा का बहर संपला की वाताहत अटळ आहे, हा निसर्गाचा नियम आहे. देशात भाजपाची सत्ता आल्यास त्यावर सर्वप्रथम हक्क महाराष्ट्राचा होता. आणि पंतप्रधान पदावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संजय जोशी किंवा नितीन गडकरी यांची वर्णी लागणार होती. संजय जोशी गुजरातचे भाजपा प्रभारी म्हणून काम करत होते. नरेंद्र मोदी यांच्या गुजरातच्या मुख्यमंत्री होण्यामागे संजय जोशी यांचा सिंहाचा वाटा होता.

संजय जोशी यांच्या तथाकथित सेक्स स्कँडल सीडी गुजरात भाजपाने स्व. अरुण जेटली यांचे परममित्र रजत शर्मा यांचेकडे सोपवल्या, आणि संजय जोशी यांची कारकीर्द संपवली. नितीन गडकरी यांना भ्रष्टाचार न केलेल्या पूर्ती प्रकरणात बदनाम केले, यात ‘टिम अण्णा’ अग्रस्थानी होती. गडकरींना भाजपाच्या ‘राष्ट्रीय अध्यक्ष’ पदावरुन हटवण्यात आले साहजिकच पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून बाजूला फेकले गेले.

हे सगळं सुरु असताना महाराष्ट्रात संघाने देवेंद्र फडणवीस नावाचा चेहरा पुढे आणला. फडणवीसांनी महाराष्ट्राची अस्मिता जपण्याऐवजी गुजराथ्यांची तळी उचलणे पसंद केले. या कामाची शाबासकी म्हणून २०१४ साली फडणवीसांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद बक्षीसी स्वरुपात मिळाले. पण जे बघायला मिळाले नसते ते भोगायला मिळाल्याने फडणवीसांना सत्तेचा कैफ सहन झाला नाही. फाजील आत्मविश्वास आणि अहंकारी फडणवीसांना अमित शहांनी २०१९ मध्ये मदत तर केली नाहीच उलट सत्तेतून खाली उतरताना अमित शहा मजा घेत राहिले.

काल तर फडणवीस यांचा निकटवर्तीय भाजपा युवा मोर्चा मुंबईचा अध्यक्ष मोहीत कंबोज याला ५७ कोटींच्या फसवणूकीत सीबीआयने ताब्यात घेतला आहे. महाजनादेश यात्रेत मोहीत कंबोज आघाडीवर होता आणि त्याने बराच पैसा महाजनादेश यात्रेत लावला अशी ऐकीव माहिती मिळतीये. याचा अर्थ स्पष्ट आहे केंद्रात बसलेल्या शेठश्यानी फडणवीसांच्या ‘पुन्हा येईन’ चा अशारितीनेच कार्यक्रम केला आहे.

देशातील प्रत्येक राज्यात संख्याबळ नसतानाही अश्वमेधाच्या घोड्याप्रमाणे घौडदौड करणाऱ्या भाजपाचे महाराष्ट्रात मात्र आपापसातील यादवीच्या चिखलात कमळ फसले! भाजपची यशाच्या शिखरावरुन घसरणीची सुरुवात झाली. किंबहुना उलट्या काळजाच्या लोकांचा हा गर्तेत जाणारा उलटा प्रवास सुरु झाला आहे.

‘काहींना काही वेळ फसवता येते, काहींना सर्व वेळ फसवता येते, पण सर्वांना सर्व वेळ फसवता येत नाही!’ या उक्तीप्रमाणे विकत घेतलेली माध्यमे, विरोधकांचे चारित्र्यहनन करण्यासाठी उभी केलेले पंचतारांकित आयटी सेल्स आणि फेक न्यूज वापरुन फक्त धार्मिक ध्रुवीकरण आणि द्वेष पेरता येतो, विकास करता येत नाही!

मणिपूर राज्यामध्ये नेमकं हेच झालंय. २०१७ मध्ये सत्तेत बसवलेलं भाजपप्रणित सरकार अडचणीत आलं आहे. बुधवारी भाजपच्या तीन आमदारांनी राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. तर इतर सहा आमदारांनी पाठिंबा काढून घेतला आहे. राष्ट्रीय जन पक्षाचे चार, तृणमूल काँग्रेस एक आणि एका अपक्षाने पाठिंबा काढत काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं आहे.

गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनाही या जंगलयुगाचा कंटाळा आलाय. आयटीसेल आणि फेक न्यूजच्या माध्यमातून भडकवलेल्या आणि भरकटवलेल्या असंतुष्टाच्या मनगटांचा वापर करुन संपूर्ण समाजाच्या सलोख्याला आणि सौजन्याला यापुढे फार काळ ठोसे लगावणे शक्य होणार नाही!
#कालायतस्मेंनमः
https://www.facebook.com/tushar.gaikwad.376043/posts/1198095317204835

Team Lokshahi News