मुंबई | स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI Clerk Recruitment) लवकरच लिपिक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करणार आहे. इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अधिकृत साइट sbi.co.in वर जाऊन नोंदणी करू शकतात. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तरीही लवकरच याची अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे.

  • या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड प्राथमिक परीक्षा आणि मुख्य परीक्षेद्वारे केली जाईल.
  • या परीक्षेत एकूण 100 प्रश्न विचारले जातील.
  • ही परीक्षा 100 गुणांची असेल, ज्यासाठी उमेदवारांना एक तासाचा वेळ दिला जाईल.
  • उमेदवारांनी या भरतीशी संबंधित तारखा आणि इतर आवश्यक माहितीसाठी अधिकृत साइटवर लक्ष ठेवावं.
  • या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांचं वय 20 ते 28 वर्षे दरम्यान असावे.
  • जे उमेदवार SBI JA Pre Exam 2022 साठी पात्र ठरतील त्यांना SBI Clerk Mains Exam 2022 साठी द्यावी लागेल.

इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी आजपासूनच तयारीला सुरुवात करा. या परीक्षेची चांगली तयारी करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी अभ्यासक्रम नीट समजून घ्यावा. अभ्यासासाठी योग्य पुस्तकं आणि मार्गदर्शन घ्या. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) लिपिक परीक्षेत यश मिळवण्यासाठी योग्य साहित्य निवडा आणि त्याच्या आधारे तयारी करा.