मुंबई | तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स मुंबई (Tolani College of Commerce Mumbai TCC Mumbai) अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Tolani College of Commerce Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सहायक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2022 आहे.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
सहायक प्राध्यापक (Assistant Professor) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कॉमर्स, बॅचलर ऑफ मॅनेजमेन्ट, ऍडव्हान्स अकाउंटन्सी, बीकॉम या पैकी कोणत्याही क्षेत्रात ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठीचा पत्ता
प्रिन्सिपल, तोलानी कॉलेज ऑफ कॉमर्स, 150-151, शेर-ए-पंजाब सोसायटी गुरु गोविंद सिंग मार्ग, महाकाली लेणी रोड, अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र 400093

अधिक माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी – क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://tcc.tolani.edu/ या लिंकवर क्लिक करा.