मुंबई | राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या कुशल मनुष्यबळांची भरती सुरू असून त्यासाठी शासनाच्या पुढाकाराने खाजगी तसेच सरकारी आस्थापनांना भरतीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे. त्याचाच भाग म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यात रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले जात आहे.

सध्या रायगड, चंद्रपूर, नंदूरबार या तीन जिल्ह्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यामाध्यमातून 1000 पेक्षा अधिक पदे भरली जाणार आहेत.

  • रायगड येथे प्रशिक्षणार्थी, ईपीपी प्रशिक्षणार्थी केमिकल अभियंता, प्रशिक्षणार्थी/अधिकारी पदांकरिता रोजगार मेळावा -1 चे आयोजन करण्यात आलेले आहे. रोजगार मेळाव्याची तारीख 07 जून 2022 आहे.
    मेळाव्याचे ठिकाण – रोहा इंडस्ट्रीज असोसिएशन हॉल, प्लॉट नं.6, M.I.D.C., धाटाव, ता. रोहा, जि. रायगड.
  • चंद्रपूर येथे जीवन विमा सल्लागार / मालमत्ता सल्लागार, प्रशिक्षणार्थी, व्यवस्थापक, पर्यवेक्षक, ड्रायव्हर, बॅगर, सेल्स गर्ल, ऑपरेटर, ऑडिटर पदांकरिता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. मेळाव्याची तारीख 09 जून 2022 आहे.
    मेळाव्याचे ठिकाण – शासकीय आयटीआय महाविद्यालय चंद्रपूर
  • नंदुरबार येथे खाजगी नियोक्ता करीता रोजगार मेळावा नंदुरबार 2 चे आयोजन करण्यात आलेले आहे. रोजगार मेळाव्याची तारीख 09 & 10 जून 2022 आहे.
    मेळाव्याचे ठिकाण – शासकीय औधोगिक प्रशिक्षण संस्था (ITI) नंदुरबार

इच्छूक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. 

जाहिरात : http://bit.ly/3dteypg
नोंदणी : https://cutt.ly/QJzt6Wy