मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांस बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न / संधी मर्यादित करण्याचा निर्णय आयोगाकडून रद्द करण्यात आला असून आयोगाच्या प्रस्तुत निर्णयास अनुसरुन राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ करीता दिनांक ११ मे २०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीमधील परिच्छेद क्रमांक ७.८ रद्द करण्यात येत आहे.
प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीमधील परीक्षेच्या संधीसंदर्भातील तरतुदीमुळे बऱ्याचशा उमेदवारांनी प्रस्तुत परीक्षेस अर्ज सादर केला नसल्याची शक्यता असल्यामुळे तसेच परीक्षेच्या संधी मर्यादित करण्याचा निर्णय रद्द झाल्याने अर्ज सादर करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना परीक्षेस अर्ज करण्याची न्याय्य संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विषयांकित परीक्षेस अर्ज सादर करण्यास खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे.
(१) ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचा व अंतिम दिनांक:-दिनांक २४ जून २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत
(२) ऑनलाईन पध्दतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक:- दिनांक २४ जून २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत
(३) भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावयाचे झाल्यास चलनाची प्रत घेण्याचा अंतिम दिनांक: दिनांक २५ जून २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत
(४) भारतीय स्टेट बँकमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्काचा भरणा करण्याचा अंतिम दिनांक:- दिनांक २७ जून २०२२ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेत
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 मधून भरण्यात येणाऱ्या सहाय्यक संचालक, मुख्याधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, सहायक आयुक्त, उप अधीक्षक, कक्ष अधिकारी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था तसेच तत्सम पदांच्या एकूण 161 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जून 2022 24 जून 2022 (मुदतवाढ) आहे.
- पद संख्या – 161 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
- अर्ज शुल्क –
- अमागास – रु. 544/-
- मागासवर्गीय – रु. 344/-
- वयोमर्यादा –
- खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
- मागासवर्गीय/ अनाथ – 43 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 12 मे 2022
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख –
01 जून 202224 जून 2022 (मुदतवाढ) - अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
PDF जाहिरात (Adv.045/ 2022) | https://cutt.ly/2Ht0Dhg |
ऑनलाईन अर्ज करा | https://bit.ly/3mXrwAb |
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्य सेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. राज्य सेवा आयोगाची 2022 साठीची पूर्व परीक्षा 21 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. या अंतर्गत एकुण 161 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून या जाहिराती संदर्भात माहिती दिली आहे. राज्यातल्या 37 केंद्रांवर राज्य सेवा पूर्व परीक्षा होणार आहे. वित्त आणि लेखा सेवा गट अ सहाय्यक संचालक, नगरपालिका- नगरपरिषद मुख्याधिकारी गट अ, राज्य उत्पादन शुल्क विभाग गट ब या आणि बालविकास विभागाच्या पदांसाठी ही पूर्वपरीक्षा घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या या पूर्व परीक्षेत गट ‘अ’ मध्ये 59 आणि गट ब मध्ये 14 पदांसाठी तसेच इतर 88 पदांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. 21 ऑगस्ट 2022 रोजी पूर्व परीक्षा पार पडल्यानंतर जानेवारी 2023 मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र असतील. 21 जानेवारी ते 23 जानेवारी किंवा त्यानंतर आयोगाकडून मुख्य परीक्षा आयोजित करण्यात येईल.