मुंबई | सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी ऑइल अँड नॅचरल गॅस लिमिटेडने नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 922 पदांची भरती केली जाणार आहे. अर्जाची प्रक्रिया 7 मे 2022 पासून सुरू आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2022 आहे. इच्छुक उमेदवार ONGC च्या अधिकृत वेबसाइट www.ongcindia.com द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

या रिक्त जागा देहरादून (उत्तराखंड), दिल्ली, मुंबई (महाराष्ट्र), गोवा, गुजरात, जोधपूर (राजस्थान), चेन्नई, झारखंड आणि कराईकल (तामिळनाडू आणि पुद्दुचेरी), आसाम, आगरतळा (त्रिपुरा), कोलकाता (पश्चिम बंगाल) आणि बोकारो (पश्चिम बंगाल) येथे आहेत. कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ तंत्रज्ञ आणि इतर पदांसाठी भरती केली जाणार आहे.

अर्जदाराचे वय
अर्जदारांचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे असावे. उमेदवाराचा जन्म 15 मे 1998 ते 15 मे 2004 दरम्यान झालेला असावा. उच्च वयोमर्यादा ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षे, SC/ST उमेदवारांसाठी पाच वर्षे आणि शारीरिकदृष्ट्या अपंग उमेदवारांसाठी दहा वर्षे शिथिल असेल.

या पदांसाठी अशी असेल निवड प्रक्रिया
या पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड संगणक आधारित चाचणीद्वारे केली जाईल. याशिवाय पीएसटी, पीईटी, स्किल टेस्ट किंवा टायपिंग टेस्ट घेतली जाईल.

पगार
निवडलेल्या उमेदवारांना पदांनुसार वेगवेगळे वेतन दिले जाईल
1. F1 स्तर रु. 29,000 – रु. 98,000
2. A1 स्तर रु. 26,600 – रु. 87,000
3. W1 स्तर रु 24,000 – रु 57,500

ऑनलाइन अर्ज कसा करावा? (How to Apply Online?)
इच्छुक उमेदवार ONGC ची अधिकृत वेबसाइट ongcindia.com वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. अधिक तपशिलांसाठी उमेदवारांना ONGC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचा सल्ला दिला जातो. तसेच उमेदवार थेट या संकेतस्थळावर https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/76282/Instruction.html क्लिक करून अर्ज करू शकतात.

Follow Us On : Google News