रेल्वे भरती बोर्ड परीक्षा 2021 चा निकाल जाहीर

मुंबई | रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने एनटीपीसी परीक्षा 2021 चा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन आपला निकाल पाहता येणार आहे.

ऑनलाइन परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात बसलेले उमेदवार त्यांचा निकाल त्यांच्या संबंधित क्षेत्रानुसार आरआरबीच्या अधिकृत प्रादेशिक वेबसाइटवर पाहू शकतात. सीबीटी 1 साठी निवडलेल्या उमेदवारांना दुसऱ्या परीक्षेत बसता येणार आहे. एनटीपीसी फेज 2 ची परीक्षा 14 ते 18 फेब्रुवारी 2022 दरम्यान घेतली जाणार आहे. निवडलेल्या उमेदवारांची यादी रेल्वे भर्ती बोर्डाने (RRB) प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेतून 30 हजारांहून अधिक नोकऱ्या दिल्या जाणार आहेत.

अधिकृत वेबसाईट – rrbald.gov.in

RRBC निकाल २०२१ जाहीर झाल्यावर, तुमच्या संबंधित प्रादेशिक वेबसाइटला भेट द्या.
वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर, तुम्हाला RRB NTPS निकाल 2021 (CBT 1) ची लिंक मिळेल. त्यावर क्लिक करा.
पीडीएफ फॉरमॅटमधील निकाल तुमच्या मोबाईल/कॉम्प्युटर स्क्रीनवर उघडतील.
परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांना रोल नंबर दिले जातील.
तुमचा रोल नंबर शोधण्यासाठी, ctrl + F दाबा आणि दिसत असलेल्या बॉक्समध्ये तुमचा रोल नंबर टाका.

सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळवण्यासाठी आजच जॉईन करा WorkMore टेलिग्राम, आणि व्हाटस् अप ग्रुप व मिळवा दररोज नवनव्या नोकरींची मोफत माहिती…(Join होण्यासाठी WorkMore(T), WorkMore (W)या लाल रंगाच्या लिंकवर क्लिक करा)

रेल्वे भरती बोर्डानं (RRB) नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) भरतीच्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षांच्या तारखांची घोषणा केली आहे. आरआरबीनं जारी केलेल्या सूचनेनुसार परीक्षेचं (RRB NTPC CBT 2 exam) आयोजन 2022 मध्ये केलं जाणार आहे. ही परीक्षा 14 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. याशिवाय आरआरबीनं एनटीपीसी सीबीटी -1 निकालाची तारीख जाहीर केली आहे.

आरआरबीनं जारी केलेल्या नोटीसनुसार एनटीपीसी सीबीटी-1 परीक्षेचा निकाल जानेवारी 2022 मध्ये जाहीर केला जाणार आहे. फर्स्ट स्टेज सीबी आरआरबी एनटीपीसी सीबीटी परीक्षा निकाल 15 जानेवारी 2022 पर्यत जाहीर केला जाणार आहे. आरआरबीच्या विविध प्रादेशिक वेबसाईटस वर निकाल जाहीर केला जाईल. उमदेवारांनी ज्या विभागातून अर्ज केला असेल त्या विभागाच्या वेबसाईटवर निकाल उपलब्ध होणार आहे. उमेदवार तिथं निकाल पाहू शकतात.

RRB NTPC CBT-2 Hall Ticket

आरआरबी एनटीपीसी सीबीट परीक्षा 1 चा निकाला जाहीर झाल्यानंतर सीबीटी 2 परीक्षा आयोजित केली जाणार आहे. जे विद्यार्थी पहिल्या टप्प्यातील परीक्षेत उत्तीर्ण होती त्यांना दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेसाठी संधी मिळणार आहे. एनटीपीसी सीबीटी 2 साठी पहिल्या टप्प्यातील परीक्षेसाठी उत्तीर्ण उमेदवारांना प्रवेशपत्र दिली जातील. जानेवारी 2022 ज्या शेवटच्या आठवड्यात प्रवेशपत्र उपलब्ध होतील.

सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळवण्यासाठी आजच जॉईन करा WorkMore टेलिग्राम, आणि व्हाटस् अप ग्रुप व मिळवा दररोज नवनव्या नोकरींची मोफत माहिती…(Join होण्यासाठी WorkMore(T), WorkMore (W)या लाल रंगाच्या लिंकवर क्लिक करा)