Categories: बातम्या राजकीय

रोहित पवार यांचे गोपिचंद पडळकरांना सडेतोड उत्तर; म्हणाले मी कुणाच्या खांद्यावर बसतो याकडं लक्ष देण्यापेक्षा…

मुंबई | भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर चर्चेत राहण्यासाठी काही ना काही मार्गाने सतत प्रयत्न करत असल्याचे दिसते. असाच प्रयत्न त्यांनी राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांना कर्जत मतदार संघातील खराब रस्त्यावरून लक्ष्य करून केला. यावेळी पडळकरांनी रोहित पवार यांच्यावर वैयक्तिक टीका देखील केली. परंतु रोहित पवारांनी पडळकरांच्या टीकेला सडेतोड उत्तर देत पडळकरांची बोलतीच बंद केल्याचे दिसून आले. 

आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांना लक्ष्य करताना, शरद पवारांच्या खांद्यावर बसून मी महाराष्ट्रात सर्वात उंच असल्याचा आभास झालेल्या रोहित पवारांनी खांद्यावरून खाली मतदार संघात उतरावे व मतदार संघातील कामावर लक्ष द्यावे. मोदी व फडणवीस साहेबांना सल्ले देत बसू नये. पडळकरांनी औरंगाबाद दौऱ्यावर असताना व्हीडीओच्या माध्यमातून रस्त्याची दुरावस्था दाखवण्याचा प्रयत्न करत रोहित पवारांवर ही टीका केली होती. हा व्हीडीओ व्हायरल होताच रोहित पवारांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून कर्जत मतदार संघाची आणि तिथल्या रस्त्यांच्या दुरावस्थेची कारणे स्पष्ट करताना गेली २५ वर्षे तुमच्याच पक्षाचे आमदार या मतदार संघात होते. आणि त्यांच्यामुळे मतदार संघाची झालेली दुरावस्था दूर करण्यासाठीच लोकांनी मला निवडून दिल्याचेही पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे. 

Rohit Rajendra Pawar यांचे पडळकर यांना उत्तर
माझे मित्र गोपीचंद पडळकर जी…

गोपीचंद पडळकरांनी रोहित पवारांवर काय टीका केली होती पहा…

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Rohit Pawar