Categories: गुन्हे राजकीय सामाजिक

दहशतवादी दाऊद संदर्भात रोहित पवारांची मोदींकडे विनंती..!

दहशतवादी दाऊद इब्राहिमला कुठल्याही परिस्थितीत भारतात आणा, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. दाऊद इब्राहीम कराचीत असल्याचं पाकिस्ताननं कबूल केलं आहे. त्याला भारतात आणण्यासाठी सर्वोत्तोपरी प्रयत्न करा, अशी मी पतंप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करतो. दाऊदला कुठल्याही परिस्थितीत भारतात आणा, असं ट्विट रोहित पवारांनी केलं आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या वतीने जगभरातील 88 दहशतवादी नेत्यांची एक यादी तयार करण्यात आली आहे. यात दाऊद इब्राहिम आणि त्याच्या सहकाऱ्यांचीही नावं आहेत. दरम्यान, दाऊद इब्राहिमवर मुंबईमध्ये 1993 मध्ये झालेल्या दहशतवादी बॉम्बहल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे. यामागे तोच मास्टरमाइंड असल्याचा आरोप आहे.

Lokshahi News