कोल्हापूर | उत्तरप्रदेश मधील हाथरस येथे घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचे देशभरातून तीव्र पडसाद उमटत आहेत. या बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी रवाना झालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांना गुरुवारी उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली. तिथे त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. घडलेल्या या प्रकारानंतर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी फेसबुकच्या माध्यमातून योगी सरकारवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले सतेज पाटील…
आज सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी लढणारे राहुल गांधी आणि त्यांना जमिनीवर पाडणारे हुकूमशाही वृत्तीचे भाजप सरकार हे तमाम देशवासीयांनी पाहिले आहे. हे छायाचित्र जनतेच्या कायम लक्षात राहील आणि योग्यवेळी जनता आपल्या कृतीतून त्याचे उत्तर देईलच! आणि तोवर जनतेच्या बाजूने बोलायला आम्ही आहोतच.