विधानपरिषदेच्या निकालानंतर सतेज पाटील यांचा ‘जितानेका जिम्मा..’ व्हायरल!

854
satej patil

मुंबई | पुणे पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला धोबीपछाड केले असून अरूण लाड यांच्या रूपाने दणदणीत विजय मिळविला आहे. तर शिक्षक मतदार संघात देखील महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर यांनी विजय मिळवला. महाविकास आघाडीच्या दृष्टीने विधान सभेनंतर झालेल्या उलथापालथीनंतरचा हा मोठा सकारात्मक निकाल मानला जात आहे. 

लोकसभा, विधान सभा आणि आणि आता विधानपरिषदेच्या निवडणूकीतही कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपली छाप उमटवल्याचे दिसत आहे. लोकसभेपासून ‘आमचं ठरलयं..’ म्हणून जिल्ह्याच्या राजकारणात त्यांनी मोठा बदल घडवून आणला होता. तसेच मागील महिन्यात झालेल्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान विधानपरिषद निवडणूकीच्या बाबतीत त्यांनी ‘जितानेका जिम्मा बंटी पाटील लेता है’ असा शब्द महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिला होता. हा शब्द त्यांनी खरा करून दाखविला असून निकालानंतर त्यांचा हा व्हिडिओ सगळीकडे चांगलाच व्हायरल होत आहे.