Categories: आरोग्य राजकीय

आपला जीव आपणच वाचवा कारण पंतप्रधान मोदी मोरांसोबत व्यस्त आहेत!

नवी दिल्ली | कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. केंद्र सरकार कोरोना बाबतीतील उपाययोजना करण्यात अपयशी ठरल्याचे सांगत राहुल गांधीनी पंतप्रधान मोदी मोरासोबत व्यस्त असून देशातील नागरिकांनी आपला जीव स्वतः वाचवावा, असं आवाहन केलं आहे. 

राहुल गांधी यांनी यासंदर्भात केलेल्या ट्विट मध्ये लिहियलं की, “भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या या आठवड्यात ५० लाखांपेक्षा अधिक झाली आहे. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील १० लाखांचा आकडा पार करेल. कोणतंही नियोजन न करता केलेला लॉकडाऊन एका व्यक्तीच्या अहंकाराचा परिणाम आहे. त्यामुळे संपूर्ण देशात कोरोनाचा संसर्ग झाला. मोदी सरकार ‘आत्मनिर्भर बनो’ असं म्हणत आहे या ‘आत्मनिर्भर’ होण्याचा अर्थ आपला जीव आपणच वाचवा असा आहे. कारण पंतप्रधान मोदी मोरांसोबत व्यस्त आहेत.”

Team Lokshahi News