school
मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा १५ ऑक्टोबरपासून सुरू न करता दिवाळीनंतर सुरू करण्याचा निर्णय घ्यावा अशी चर्चा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी झाली.
केंद्र सरकारने १५ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याची भूमिका घेतली आहे. मात्र राज्यातील कोरोनाचा वाढता आकडा लक्षात घेता परिस्थिती पाहून दिवाळीनंतर या बाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. तसेच ऑनलाइन शिक्षणाची व्याप्ती वाढविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत स्पष्ट केले. यावेळी मंत्रिमंडळ बैठकीत कोरोनाच्या सद्यस्थितीबाबतचे सादरीकरण करण्यात आले.