Categories: व्हायरल

अमुल डेअरी च्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त कितीजणांना ६००० रूपये मिळाले पहा..

मुंबई : सध्या अनेक मोठमोठ्या संस्था त्यांच्या वर्धापनदिनानिमित्त ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारची गिफ्ट देत असल्याचे संदेश सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी टाटा ग्रुपच्या वतीने कार भेटस्वरूपात दिली जात असल्याचा संदेश सोशल मिडीयावर व्हायरल होत होता. तसाच संदेश आता देशातील सुप्रसिध्द डेअरी ‘अमुल’च्या बाबतीतही व्हायरल होत आहे. या व्हायरल मेसेज मध्ये लोकांना अमुलच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त प्रश्नावली व्दारे ६००० रूपये जिंकता येत असल्याचे सांगितले जात आहे.

अमूलच्या नावाने पाठवल्या जात असलेल्या खालील लिंकवर क्लिक केल्यास
१) http://handsomeuniverse.top/amul/tb.php?_t=16338473461633847787131
२) http://correctcabin.top/amul/tb.php?_t=16339690901633969209078
३) http://approveaware.top/a82fBFpHBEp8fURJQX1CCApEcEJ4dwcAD1RyWlgiHxcJXTcwbXcHQFRYISU?cto1633940896043
४) http://emperorvelvet.top/amul/tb.php?_t=16338834071633883478993
आपल्याला या पेजच्या सर्वात वर अमूलचा लोगो लावलेला दिसत आहे. यामध्ये खाली, ‘Amul 75th Aniversary’ आणि खाली मोठ-मोठ्या अक्षरात ‘Congratulation’ लिहिले आहे.

याच्या खाली एका लाईनमध्ये ‘प्रश्नावलीद्वारे ६००० रुपये मिळवण्याची संधी मिळेल’ असे लिहिले आहे. या खाली प्रश्न दिलेले आहेत. याची उत्तर दिल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर काही बॉक्स दिसत आहेत, जे अमूलच्या लोगोसारखे डिझाईन केले आहेत. यामध्ये कोणत्याही एक बॉक्सवर क्लिक करण्यासाठी तीन संधी दिल्या जात आहेत. तुम्ही बॉक्सवर क्लिक केल्यानंतर ६००० रुपये जिंकता, असा संदेश दिसत आहे. त्यानंतर हा संदेश पुढे काही ग्रुपसना अथवा लोकांना पाठविण्यास सांगितले जात आहे.

आता या व्हायरल मेसेजच्या माध्यमातून कितीजणांनी ६००० रूपये मिळवले, याची माहिती घेणेही गरजेचे आहे. यासाठी आम्ही अमुलच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर जाऊन माहिती घेतली असता काय दिसून आलय तुम्हीच पहा

म्हणजेच याचा अर्थ अमुलकडून अशी कोणतीही ऑफर किंवा संदेश सोशलमिडीयाव्दारे लोकांना पाठवले जात नाहीत. हा एक प्रकारचा फ्रॉड असून अशा लिंकवर क्लिक करू नये असे आवाहन अमुल कडून करण्यात आले आहे. त्यामुळे ६००० रूपये जिंकल्याचा संदेश खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: amul dairy viral msg amul group