Categories: शिक्षण/करिअर

ITI प्रवेशाकरिता ‘या’ लिंकवर पहा सुधारित ऑनलाईन वेळापत्रक..!

कोल्हापूर | औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये २०२० सत्राकरिता एकूण ३१ व्यवसायिक अभ्यासक्रमाकरिता सुधारित ऑनलाईन प्रवेश प्रकिया वेळापत्रक जाहीर झाले आहे. प्रवेश अर्ज ऑनलाईन ITIAdmissionPortal: https://admission.dvet.gov.in  या संकेतस्थळावर भरण्याचे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे. 

प्रवेश अर्ज ३१ ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन भरण्याबाबत व प्रवेशाबाबत कार्यवाही चालू झाली आहे. ज्या उमेदवारांनी यापूर्वी प्रवेश अर्ज भरले असतील अशा उमेदवारांना अर्जातील माहितीमध्ये बदल करावयाचा असेल तर संकेतस्थळावर इडिट ऑप्शन चालू करण्यात आलेला आहे. प्रवेश अर्ज भरलेल्या उमेदवारांनी पुढील सर्व ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी त्यांचा पासवर्ड जतन करून ठेवणे आवश्यक आहे. प्रवेश एकूण सहा प्रवेश फेऱ्यांमध्ये होतील. शासकीय आयटीआय कोल्हापूर येथे प्रवेशाकरिता मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचा लाभ सर्व उमेदवारांनी घेवून प्रवेशासाठी बिनचूक व्यवसाय विकल्प सादर करण्याचा लाभ घ्यावा. 

या संस्थेत एकूण ३१ व्यावसायिक अभ्यासक्रम असून एक वर्ष मुदतीचे एकूण १५ व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत. दोन वर्ष मुदतीचे एकूण १६ अभ्यासक्रम आहेत. चालू वर्षी दोन्ही मिळून एकूण १३६४ जागा भरल्या जाणार आहेत. संस्थेची माहिती युट्युब च्या https://youtu.be/DiWffmwLAmE  या लिंकवर उपलब्ध आहे. व्हिडीओचे नाव ITI KOLHAPUR ADMISSION असे आहे. प्रवेशाबाबतचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी त्याप्रमाणे कार्यवाही करावयाची आहे.

Team Lokshahi News