Categories: राजकीय

पडळकरांवर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

सातारा | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेवर अखेर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. सातारा येथे पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “गोपीचंद पडळकरांना महत्व देण्याची गरज नाही, त्यांचं अनेकवेळा डिपॉझिट जप्त केलंय, त्यांच्यावर काय बोलायचं” अशा शब्दात पडळकरांचा समाचार घेतलाय. 

शरद पवारांना गोपीचंद पडळकरांच्या टीकेवर प्रतिक्रिया विचारली असता, त्यावर पवार म्हणाले, “पडळकरांना मी जास्त महत्त्व देत नाही. बारामतीत लोकसभा निवडणूक लढली, डिपॉझिट जप्त झालं, विधानसभेची निवडणूक लढलं, तिथेही डिपॉझिट जप्त झालं. मग सांगलीत लोकसभा लढवली, तिथेही गड्याचं काही चाललं नाही. त्यामुळे काय बोलायचं” असं म्हणत शरद पवार यांनी पडळकर हा विषय आपल्यासाठी कधीच संपल्याचे अप्रत्यक्षरित्या सांगितले. 

याशिवाय पवार यांनी, देवेंद्र फडणवीस हे काहीही बोलून प्रसिद्ध मिळवत आहेत, असं म्हणत फडणवीसांच्या मुलाखतीतील गौप्यस्फोटावरही तिरकस निशाणा साधला. 

Team Lokshahi News