Categories: राजकीय

‘ह्या’ युवतीने केली आमदार वैभव पिचड यांच्या कामाची चिरफाड; जनतेस लिहिले खुले पत्र

अकोले। खरंतर कुणावर टिका-टिप्पणी करायचं माझं वय नाही, पण सध्याची परिस्थिती पहाता मला रहावत नाही. म्हणून मी माझे मत आपल्या सर्वांपुढे मांडत आहे. काही दिवसांपासून अकोले विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार वैभव पिचड हे भाजप पक्षात प्रवेश करणार म्हणून चर्चा आहे. पिचड घराणे अनेक वर्षे सत्ता उपभोगत आहे, पण यांनी कधी सर्वसामान्य माणसाचा विचारच केलाच नाही. 

स्वतःला मात्र जलक्रांतीचे जनक म्हणून घेतलं. अदिवासी आरक्षित हा मतदार संघ आहे मी स्वतः या मतदारसंघातील मतदार युवती आहे. अकोले तालुका हा पर्यटनाच्या दृष्टीने अगदी महत्वपूर्ण मानला जातो. अकोले तालुक्यात भंडारदरा, निळवंडे यासारखे मोठे धरण प्रकल्प आहे तरी साधी MIDC सुरू करून तालुक्यातील युवकांना रोजगार निर्मिती करावी अस कधी यांना वाटल नाही, पण याच्या उलट बोंब मात्र आहेच धरण आम्ही बांधली. अहो बांधली तुम्ही धरण, पण पाणी मात्र बाहेर देऊन तालुका भकास केला त्याच काय. 

पिकं जळून गेली, हाता तोंडाशी आलेला घास हिसकावला गेला. म्हणजे ते अस झालं ‘धरण डोक्याला आणि कोरडं घशाला…’ खरंतर सांगायला वाईट वाटत आहे पण धरणाजवळील सगळ्या गावातील अदिवासी महिला मार्च-एप्रिल मध्येच पाण्यासाठी पायपीठ करत असतात. यांनीच तालुक्याचं पाणी विकायच आणि परत यांनीच पाण्याच आंदोलन करायचं.

आमदार काय करतात तर सकाळी १०-११ पर्यंत झोपा काढतात, आणि हे काय जनतेचे प्रश्न सोडवणार. विद्यार्थी, मतदार प्रश्न घेऊन गेले की त्यांना कोणीच दिसत नाही. तालुक्यात शिक्षणाची विशेष अशी काही सोय नाही. जवळ जवळ ७५% मुलं ही शिक्षणासाठी बाहेर गावी, शेजारील तालुक्यात शिकायला जातात. हे तर याचं कामच फक्त आहे त्या शिक्षण संस्थेतून आपले खिशे कसे भरता येतील एवढंच काय ते पहायचं.


तालुक्या लगत नाशिक, पुणे, मुंबई अशा तीन मोठ्या शहरांची हद्द आहे. त्यांच्या तालुक्यातील रस्ते बघा आणि अकोले तालुक्यातील. तर सगळ्या अकोले तालुक्यात रस्त्यांची बोंब. एक रस्ता तालुक्यात व्यवस्थित नीटनेटका नाही. पण यांनी मात्र ३-४ महिन्यांला ५०-५० लाखांच्या गाड्या बदलायच्या. आदरणीय शरद पवार साहेबांनी ४० वर्षे मधुकर पिचडाना मंत्री केलं, ५ वर्षे विरोधी पक्ष नेता केलं, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष केलं आणि यांच्या  चिरंजीवानी मात्र कधी कुणाचे फोन उचलायचे नाही, कधी कुणाला भेटायचं नाही आलेल्या लोकांना काही तरी कारण काढून भेटणं टाळायचं. मी स्वतः बरेचदा फोन केले तर मला उत्तर काय? दुपारी २-३ वाजता साहेब झोपले आहेत, म्हणून किंवा मग कुणाचे फोनच उचलायचे नाही. मी अनेक मंत्री, खासदार, आमदार बघते, भेटते, फोन करते पण हे असले इतर कुणाच्या वागण्यात दिसलं नाही.

अदिवासी आरक्षित मतदारसंघ असल्यामुळे अदिवासी निधी मोठ्या प्रमाणावर येतो. निधी आला तर तो लगेच सगळा घशात घालून विदेशात फिरायला जायचं. आज ही तालुक्यातील आश्रम शाळा सुधारलेल्या नाहीत. कारण आश्रमाच्या कामांचे सगळे पैसे खिशात घातले. शेतीचे नुकसान करायचे आता ते कसे प्रश्न असेल चांगल्या काळ्याभोर सुपीक जमीन वर कॅनलला विरोध करायचा आणि दुसरीकडे शेतकऱ्यांची दिशाभूल करत कॅनल जाऊ द्या म्हणायचं. शेतीचे उभ्या पिकांची नासधूस करायची. 

जनता मेली तरी यांना काही फरक पडत नाही. हे मश्गुल विदेशी दौरे करण्यात. चुकून कधी तरी आमदार म्हणून जनते दरबारी दिसत असले म्हणजे तालुक्यात वैगेरे नाही. आमदार म्हणून आपल्याला या जनतेने निवडून दिलं आहे, म्हणून आपण तिथे थांबून त्याचे प्रश्न समजून घेऊन सोडवले पाहिजे किंवा फोन उचलला पाहिजे असेही कधी होत नाही. कधीही विचारा… आमदार बाहेर देशात, नाही तर बाहेर गावी… इतकच उत्तर! आम्ही तर पाहिलं नाही काळा आहे की गोरा पण आहे मात्र चाबरा…!

विशेष – या संदर्भात मी मा.पंतप्रधान, मा.अमित शहा व मा.मुख्यमंत्री महोदय यांना ही हे पत्र लिहून आणि मेल करून पाठवणार आहे. तसेच स्वतः मा.मुख्यमंत्री साहेबांची भेट घेणार आहे. आमच्या भावना आणि आमदारांची लायकी ही कळवणार आहे.

  • © कु.शर्मिला सुभाषराव येवले
  • 7038443776
  • sharmilayewale1998@gmail.com
Rajendra Hankare

Share
Published by
Rajendra Hankare
Tags: अकोले अहमदनगर आमदार वैभव पिचड कॉंग्रेस बीजेपी माजी मंत्री मधुकरराव पिचड राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार शर्मिला येवले शिवसेना स्वाभिमानी शेतकरी संघटना