Categories: आरोग्य सामाजिक

हातकणंगले पोलिस ठाण्यातील ‘ती’ महिला पोलिस कॉंस्टेबल कोरोनाबाधित..!

हातकणंगले (प्रविण पवार) | जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असून ग्रामीण भागात समूह संसर्ग सुरू झाला आहे. आज हातकणंगले पोलिस ठाण्यात महिला पोलिस कॉंस्टेबल कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे डीवायएसपी, दोन सहाय्यक पोलिस निरिक्षक यांच्यासह तब्बल ४० जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. 

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार ही महिला पोलिस कॉंस्टेबल आणि तिचा पती हातकणंगले पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. चार दिवसांपूर्वी ही पोलिस कर्मचारी एका गुन्हातील आरोपीस घेऊन वडगाव येथील न्यायालयात गेली होती. तर तिचा पती टेंबलाई देवीच्या यात्रेनिमित्त शुक्रवारी पोलिस लाईन येथे आयोजित स्नेहभोजनास गेले होते. त्यामुळे या दोघांच्या संपर्कातील लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत. 

Team Lokshahi News