Categories: Featured

शिवभोजन थाळी : तुमच्या जिल्ह्यांमध्ये याठिकाणी मिळेल १० रूपयात जेवण – पहा यादी

मुंबई। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जनतेला १० रुपयांमध्ये शिवथाळीच्या माध्यमातून जेवण उपलब्ध झाले आहे. ठाकरे सरकारची ही महत्वाकांक्षी योजना असून,  बहुचर्चेत असलेली ही शिवभोजन थाळी तुमच्या जिल्ह्यात कोणकोणत्या ठिकाणी मिळणार हे जाणून घ्या. 

शिवभोजन थाळी – जिल्हा आणि ठिकाण 

क्र जिल्हा ठिकाण
1 पुणे · महानगरपालिका – हॉटेल निशिगंधा
· कौटुंबिक न्यायालय
· कात्रज कॉर्नर – जेएसपीएम उपाहारगृह
· स्वारगेट एसटी स्थानक
· गुलटेकडी- श्री. छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड – समाधान गाळा क्र. ११
· महात्मा फुले मंडई · हडपसर – गाडीतळ- शिवसमर्थ भोजनालय
2 पिंपरी चिंचवड · महापालिका उपाहारगृह
· यशवंतराव चव्हाण रुग्णालय
· वल्लभनगर बसस्थानक
· नवनगर प्राधिकरण
3 नाशिक · कृषी उत्पन्न बाजार समिती
·जिल्हाधिकारी कार्यालय
· नाशिकरोड रेल्वेस्टेशन
4 सिंधुदुर्ग · जयभवानी हॉटेल
· जिल्हा मुख्यालय – उपहारगृह
5 सोलापूर · मार्केट यार्ड
· मार्कंडये रूग्णालय
· अश्विनी रूग्णालय
6 परभणी · जिल्हा सामान्य रूग्णालय
· बस स्थानक नवा मोंढा
7 नागपूर · डागा हॉस्पिटल
· गणेशपेठ बसस्थानक
· राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल
· कळमना मार्केट
· मातृसेवा संघाजवळ, महाल
8 अहमदनगर · रेल्वे स्टेशनसमोर – दत्त हॉटेल
· माळीवाडा बसस्थानक – हमाल पंचायत संचलित कष्टाची भाकर केंद्र
· तारकपूर बसस्थानक – हॉटेल सुवर्णम प्राईड संचलित अन्नछत्र
· जिल्हा रूग्णालय – कृष्णा भोजनालय
· मार्केट यार्ड – हॉटेल आवळा पॅलेस
9 रत्नागिरी · जिल्हा शासकिय रूग्णालय
· हॉटेल मंगला
· बस स्थानक
· रेल्वे स्थानक
10 सांगली · बस स्थानक
· शासकीय रूग्णालय
· कृषी उत्पन्न बाजार समिती
11 हिंगोली · जिल्हा सामान्य रूग्णालय
12 चंद्रपूर · बस स्टँड परिसर
· गंज वॉर्ड भाजीपाला बाजार
· जिल्हा सामान्य रूग्णालय
13 वाशिम · कृषी उत्पन्न बाजार समिती
· जिल्हा सामान्य रुग्णालय
14 वर्धा · जिल्हा सामान्य रूग्णालय
· सत्कार भोजनालय
15 भंडारा · जिल्हा परिषद – आर्थिक विकास महामंडळ, बचतगट भोजनालय
· महसूल कॅटीन
16 कोल्हापूर · सावित्रीबाई फुले हॉस्पिटल रोड – रुद्राक्षी स्वयं महिला बचत गट
· जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हॉटेल शिवाज
· ताराबाई रोडवरील महालक्ष्मी भक्तमंडळ
· साईक्स एक्स्टेंशनजवळील हॉटेल साईराज
17 बुलढाणा · बसस्थानक
· जिजामाता प्रेक्षागार
· कृषी उत्पन्न बाजार समिती
अशी राबवली जात आहे शिवभोजन थाळी योजना

शिवभोजन थाळी ही राज्य सरकारची योजना आहे. या योजनेअंतर्गत ग्राहकांना (राज्यातील गरीब, गरजू जनतेला) केवळ १० रुपयांत भोजन मिळणार आहे. या थाळीमध्ये दोन चपाती, एक वाटी भाजी, भात, एक वाटी वरण असे पदार्थ असणार आहेत. विविध स्वयंसेवी संस्था, भोजनालयं यांच्याकडे ही थाळी ५० रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. परंतू, लाभार्थ्यांना मात्र ही थाळी केवळ १० रुपयांत उपलब्ध होणार आहे. उर्वरीत ४० रुपये हे राज्य सरकार संबंधीत भोजनालय आणि स्वयंसेवी संस्थांना म्हणजेच ही थाळी देणाऱ्या संस्थांना देणार आहे.ग् रामीण भागात ही थाळी ३५ रुपयांमध्ये मिळणार आहे. परंतू इथेही लाभार्थ्यांना ही थाळी १० रुपयांमध्येच दिली जाणार असून, उर्वरीत रक्कम राज्य सरकार संबंधीत भोजनालयं आणि स्वयंसेवी संस्थांना देणार आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: 10 रुपयांत जेवण Chief Minister Uddhav Thackeray Shiv Bhojan Shiv Bhojan Thali Place Shiv Sena Thali in Your District Thali In10 rupees Thali Meal Thali Shiv Bhojan दहा रुपयांत जेवण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवभोजन थाळी शिवभोजन थाळी ठिकाण शिवभोजन थाळी योजना शिवसेना