कोल्हापूर | राज्यातील चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्तीची शक्यता गृहित धरून शिवाजी विद्यापिठाने अंतिम वर्षाची नियोजित परिक्षा पुढे ढकलली आहे. याबाबतचे परिपत्रक प्रसिध्द करण्यात अाले असून शनिवार (१७ ऑक्टोबर), सोमवार (१९ ऑक्टोबर) आणि मंगळवार (२० ऑक्टोबर) या तीन दिवशी होणारे सर्व अभ्यासक्रमाचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत.
विद्यापिठाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार येत्या काळात चक्रीवादळाची शक्यता आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापिठाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातील परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर २१ ऑक्टोबर पासून नियोजित असलेल्या सर्व अभ्यासक्रमांच्या परिक्षा जाहिर केलेल्या तारखांनाच होणार आहेत.
ज्या अभ्यासक्रमांच्या पेपरच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत त्यांच्या सुधारित तारखा संबंधित विभागांकडून जाहीर करण्यात येतील. त्यानुसार नवीन परिक्षेचे वेळापत्रक विद्यापिठाच्या http://www.unishivaji.ac.in/ या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल असे कळवण्यात आले आहे.