Categories: गुन्हे

शिवजयंती साजरी करण्यासाठी किल्ल्यावर गेलेल्या २० वर्षीय तरुणीचा बुरूजावरून पडून मृत्यू

पुणे। शिवजयंती साजरी करण्यासाठी जुन्नरजवळ असलेल्या हडसर किल्ल्यावर गेलेल्या एका २० वर्षीय तरुणीचा  बुरूजावरून पडून मृत्यू झालाय. ही घटना आज (१९ फेब्रुवारी) सकाळच्या सुमारास घडलीय. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई येथील एक गट शिवजयंती साजरी करण्यासाठी हडसर किल्ल्यावर आला होता. सकाळी ११.३० ते १२.०० वाजण्याच्या सुमारास या गटातील एक तरुणी किल्ल्याच्या बुरूजावरून खाली पडली. खाली पडल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झालाय. सिद्धी  कामठे असे मयत तरुणीचे नाव आहे. मयत तरूणी ही ठाण्याची असून शिवजयंती साजरी करण्यासाठी मित्रांसोबत जुन्नरजवळ असलेल्या हडसर किल्यावर ट्रेकिंगसाठी गेली होती. मात्र किल्याच्या बुरूजावरून पाय घसरुन ती अडीशे ते तीनशे फुटावरून खाली कोसळली. कोसळताच मित्रांनी तसेच स्थानिक नागरिकांनी तिला रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र वाटेतच तिचा मृत्यु झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तिच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली. तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला जाणार आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: girl death Girl fall on Hadsar fort hadsar fort mumbai group Police pune pune fort