Categories: राजकीय सामाजिक

कोल्हापूर : शिवसेनेतर्फे जिल्हा प्रशासनाकडे 20 व्हेंटीलेटर सुपूर्त

कोल्हापूर | जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या उपचारार्थ मदत व्हावी या भावनेतून शिवसेनेच्यावतीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज जिल्हा प्रशासनाकडे 20 व्हेंटीलेटर सुपूर्त करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी या व्हेंटीलेटरचा स्विकार केला. तात्पुरत्या स्वरुपात शहरातील सीपीआर, इचलकरंजीतील आय.जी.एम, गडहिंग्लज येथील एस.डी.एच रुग्णालयाकडे हे व्हेंटीलेटर सुपूर्त करण्यात येणार असून गरजेनुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालयात याचा वापर करण्यात येणार आहे.

या व्हेंटीलेटरमुळे कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे रुग्ण बरे होवून जिल्ह्याचा रिकव्हरी रेट वाढण्यास निश्चितपणे मदत होईल. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर, डॉ. सुजित मिणचेकर, संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, अजित नरके यांच्यासह सेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी सेना पदाधिकारी मनजित माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी गरजूंना पीपीई किट वितरणाचा निर्णय घेतला. मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह येथे पीपीई किटचे वितरण करण्यात आले. हे पीपीई किट गरजूंना देण्यात येणार असल्याचे माने यांनी सांगितले.

Team Lokshahi News