Categories: Featured

धक्कादायक: इस्लामपूरातील आणखी १२ जण कोरोनाग्रस्त

सांगली। जिल्ह्यातील इस्लामपूर येथील कुटूंबियांमुळे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून आणखी १२ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या २३ वर पोहचली आहे. या कुटूंबातील १२ जणांचे अहवाल नुकतेच हाती आले असून ते पॉझिटिव्ह असून प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. यात दोन मोलकरणिंचाही समावेश असून त्या संबंधित घरात घरकाम करत असल्याची माहिती आहे. यासर्वांवर मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार केले जाणार आहे. दरम्यान यासोबत पाठवलेले आणखी १३ अहवाल मात्र निगेटिव्ह आले आहेत. 

या कुटूंबियातील सभासदांना हज यात्रेच्या दरम्यान कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे. सुरवातीला ४ जण कोरोनाबाधित आढळले होते. यांच्याशी संबंधित लोकांना तातडीने अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. दरम्यान या कुटूंबियांशी संबंधित कोल्हापूर जिल्ह्यातील एका महिलेलाही कोरोना झाल्याने तिच्या रूपाने कोल्हापूरातही कोरोनाचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Team Lokshahi News