Categories: अर्थ/उद्योग कृषी

शेतकऱ्यांना एक ऑक्‍टोबरपासून अल्प मुदतीचे पीक कर्जवाटप

सोलापूर | सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वतीने एक ऑक्‍टोंबरपासून शेतकऱ्यांना अल्प मुदतीचे पीक कर्ज वाटप केले जाणार असल्याचं सांगण्यात आले आहे. गेल्या सहा ते सात वर्षांपासून ज्या शेतकरी सभासदांनी अल्पमुदत पीक कर्जाची बाकी पूर्णता भरली आहे त्या सभासदांना पुनश्‍च पीक कर्ज वाटप करण्याचे धोरण बॅंकेने निश्चित केले आहे. त्यानुसार एक ऑक्‍टोबरपासून हे पीक कर्जवाटप करण्यात येणार आहे.

पीक कर्ज वाटपाच्या नवीन धोरणातंर्गत ज्या प्राथमिक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची ३० जून २०२० अखेर बॅंक पातळीवरील कर्जाची वसुली शंभर टक्के व संस्था पातळीवरील सभासद कर्जाची वसुली ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे. अशा संस्था पात्र ठरविण्यात आल्या आहेत. इष्ट तफावतीमध्ये व नफ्यामध्ये असलेल्या सोसायट्यांच्या सभासदांना अल्पमुदत पीक कर्ज वाटप केले जाणार असल्याचे संगितले आहे. नवीन धोरणानुसार जिरायती पिकांसाठी अल्पमुदत कमाल कर्ज मर्यादा २५ हजार रुपये, संपूर्ण बागायती क्षेत्रासाठी अल्पमुदत कमाल कर्जाची मर्यादा एक लाख रुपये, जिरायत व बागायत पीक कर्जासाठी एकत्रित कमाल कर्ज मर्यादा एक लाख रुपये इतकी असणार आहे.

जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत एक हजार २६४ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आहेत. त्यापैकी नवीन धोरणानुसार पीक कर्ज वाटपास ३३४ संस्था पात्र आहेत. उर्वरित संस्थानी बॅंक पातळीवर १०० टक्के वसुली व संस्था पातळीवर ५० टक्के वसुली केल्यास त्याही संस्था नवीन धोरणानुसार पीक कर्ज वाटपास पात्र होणार आहेत. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: bank loan loan for farmers short term crop loan Short term loan