Categories: अर्थ/उद्योग

PAN CARD नंबर मध्ये लपलेले असते तुमचे आडनाव; जाणून घ्या ‘त्या’ सर्व अक्षरांचा अर्थ…

मुंबई | केंद्र सरकारच्या आयकर विभागाकडून मिळालेले पॅन कार्ड हे, एक असे कार्ड (PAN Card) आहे, ज्यावर लिहिलेल्या विशिष्ट नंबरच्या माध्यमातून त्या व्यक्तीची सर्व माहिती काढली जाऊ शकते. ही माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटसाठी (Income tax department)आवश्यक असते. हे लक्षात घेऊन इन्कम टॅक्स डिपार्टमेंट प्रत्येक व्यक्तीला पॅनकार्ड जारी करते. परंतु या पॅन कार्डवरील १० अंकी विशिष्ट क्रमांकाचा अर्थ काय आहे? हे तुम्हाला माहित आहे का? नसेल माहिती तर आज आम्ही ही विशिष्ट माहिती खास तुमच्यासाठी देत आहोत. 

PAN Card च्या नंबर मध्ये लपलेले असते आपले आडनाव
पॅनकार्डच्या (PAN Card) नंबरमध्ये प्रत्येक व्यक्तीचे आडनाव लपलेले असते. पॅन कार्डवरील १० नंबरपैकी पाचवा अंक तुमचे आडनावाचे अद्याक्षर दर्शवतो. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आपल्या डेटामध्ये फक्त धारकाचे आडनाव ठेवतो. म्हणूनच PAN नंबरमध्ये देखील त्याची माहिती असते. परंतु इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ही माहिती कार्डधारकांना देत नाही. सोबतच पॅनकार्डवर खातेदाराचे नाव आणि जन्मतारीख देखील लिहिलेली असते. 

टॅक्स पासून ते क्रेडिट कार्ड सहित सर्व व्यवहारांवर नजर
पॅन कार्ड क्रमांक एक १० अंकी विशेष क्रमांक आहे, जो लॅमिनेटेड कार्डच्या रूपात येतो. पॅनकार्डसाठी (PAN Card) अर्ज केलेल्या लोकांना आयकर विभाग ते देते. पॅन कार्ड तयार करताना त्या व्यक्तीचे सर्व आर्थिक व्यवहार डिपार्टमेंटच्या पॅनकार्डशी जोडले जातात. टॅक्स भरणे, क्रेडिट कार्डद्वारे केलेले आर्थिक व्यवहार या सर्वांवर यामुळे डिपार्टमेंटची नजर असते.

डिपार्टमेंट क्रमांक ठरवते
पॅन कार्डमधील 10 अंकी कोडचे पहिले तीन अंक इंग्रजी अक्षरे असतात. हे  AAA आणि ZZZ पर्यंत कोणतेही असू शकतात. ही संख्या डिपार्टमेंट स्वत: हून ठरवते. पॅनकार्ड (PAN Card) क्रमांकाचा चौथा अंकही इंग्रजीतील एक लेटर असते. जे कार्डधारकाचे स्टेटस दर्शवते. पाचवे कॅरेक्टर एकतर आडनाव (पर्सनशी संबंधित असेल तर) अथवा एन्टिटी (दुसऱ्या केसमध्ये) शी संबंधित असते. सहाव्या पासून ते नवव्या कॅरेक्टरपर्यंत सिक्वेंशल नंबर्स (0001 से 9999) असतात. तर शेवटचे डिजिट एक अल्फाबेट चेक डिजिट असते, जे कोणतेही लेटर असू शकते. 

असे असते कार्ड धारकाचे स्टेटस
P- सिंगल व्यक्ती
F- फर्म
C- कंपनी
A- AOP (एसोसिएशन ऑफ पर्सन)
T- ट्रस्ट
H- HUF (हिंन्दू एकत्रीत कुटूंब)
B- BOI (बॉडी ऑफ इंडिविजुअल)
L- लोकल
J- आर्टिफिशियल जुडिशियल पर्सन
G- गवर्नमेंट व्यक्ती

  • नव्याने देण्यात येत असलेल्या पॅन कार्डवर उजव्या बाजूला, हे पॅन कार्ड एनएसडीएलने (NSDL) दिले असेल तर ते कधी जारी केले ती तारीखही देण्यात येते. यूटीआय-टीएसएलद्वारे (UTI-TLS) पॅन कार्ड जारी केले गेले असेल तर अशी तारीख दिली जात नाही.
  • पॅन कार्ड हे बँकांच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डप्रमाणे प्लॅस्टिक कार्डच्या स्वरूपात असते. या कार्डवर कार्डधारकाचा फोटो, त्याची जन्मतारीख, पॅनकार्ड दिल्याची तारीख, पॅन क्रमांक आणि हॉलोग्राम स्टिकर या सर्व गोष्टी असतात. हॉलोग्राम स्टिकरमुळे या कार्डाला अतिरिक्त सुरक्षा प्राप्त होते. पॅन कार्डवर कधीही धारकाचा पत्ता दिलेला नसतो. परंतु, पॅनकार्डसोबत देण्यात येणाऱ्या पत्रावर मात्र संपूर्ण पत्ता छापलेला असतो.
  • अज्ञान किंवा १८ वर्षांखालील व्यक्तीला पॅनकार्ड घ्यायचे झाल्यास ते यूटीआय-आयटीएसएलकडून दिले जाते व त्यावर धारकाचा फोटो आणि जारी केल्याची तारीख नसते.
Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: pan card check pan card correction pan card download pan card form pan card income tax pan card nsdl pan card status pan card status by name