Categories: Featured सामाजिक

सिंघम अजय देवगणचे मुंबई पोलिसांसाठी खास ट्विट, म्हणाला फक्त हाक द्या…

मुंबईकोरोनाशी दोन हात करण्यासाठी सिंघम अजय देवगणने मुंबई पोलिसांच्या जोडीने मैदानात उतरण्याची तयारी दर्शवलीय. यासंदर्भात त्याने ट्विट केले असून त्यांने दाखवलेल्या या समाजशील भावनेमुळे त्याच्यावर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

अजय देवगणने यापूर्वी कोरोनाशी लढण्यासाठी २५ कोटी ५१ लाख रूपयांची मदत केलीय. यापैकी १५ कोटी पीएम केअर फंड, ५ कोटी महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधी, ५ कोटी उत्तर प्रदेश मुख्यमंत्री सहायता निधी तर ५१ लाख फेडरेशन ऑफ वेस्टर्न सिने एम्प्लॉइजला केलीय. बॉलिवूडमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या, म्हणजेच हातावर पोट असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी त्याने हे ५१ लाख दिलेत.

अजयने आपल्या ट्विटमध्ये म्हणटलंय.. ‘प्रिय मुंबई पोलिस, तुम्ही जगातील सर्वोत्कृष्ट म्हणून ओळखले जाता. कोविड १९ साथीच्या काळात तुमचे योगदान अतुलनीय आहे. आपण हाक द्या, हा ‘सिंघम’ आपली ‘खाकी’ घालून आपल्या बाजूला उभा राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र’ असं ट्वीट अजय देवगण याने केलं आहे.

Team Lokshahi News