Categories: आरोग्य

सोलापूरः राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदाराचा कोरोनाने मृत्यू

मुंबई | सोलापूरमध्ये कोरोनाचा कहर कमी होत नाही. आता कोरोनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका माजी आमदारांचाच मृत्यू झाला आहे. युनूस शेख असे या माजी आमदारांचे नाव होते. शेख यांचा शनिवारी (१३जून) कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला होता. यानंतर शेख यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान शेख यांचा मृत्यू  झालाय. शेख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू मानले जातात.

सोलापूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोलापूर शहरात काल ४१ तर सोलापूर ग्रामीण भागात ६ रुग्ण आढळून आले. तसेच सोलापूर शहरात ६ तर ग्रामीण भागात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. आता सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ हजार ६५९ वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत सोलापूरमध्ये १४३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचा एका नगरसेवकाचा १० जून रोजी कोरोनामुळे प्राण गमावले आहे. गेल्या १५ दिवसांपासून एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली. ठाणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकला २७ मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली होती.

कोण होते युनुस शेख?

युनूस शेख १९६९, १९७५ आणि १९८५ अशा तीन टर्मला सोलापूर महापालिकेचे नगरसेवक होते. १९७५ मध्ये शरद पवार सोलापूरचे पालकमंत्री असताना त्यांनी युनूस शेख यांना महापौर पदासाठी संधी दिली. स्थायी समितीचे सभापती म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं. १९९० मध्ये ते विधान परिषदेवर निवडून गेले. मात्र, १९९८ मध्ये सुभाष देशमुख यांच्याकडून ते पराभूत झाले. त्यांच्या पश्‍चात ४ मुले, ३ मुली असा परिवार आहे.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: EX NCP MLA death by corona solapur EX NCP MLA death by corona