Categories: कृषी राजकीय

याला म्हणायचा खरा शेतकरी – झेडपी अध्यक्ष झालो म्हणून गाईगुरांच्या धारा काढून झाडलोट करायला लाज कसली?

सोलापूर।६ जानेवारी। दुधाच्या रतिबातून जे पैसे मिळतात त्यातूनच माझा घर प्रपंच चालतो. त्यामुळे झेडपीचा अध्यक्ष झालो असलो, तरी माझ्या प्रपंचासाठी गायी-म्हशीच्या धारा काढून झाडलोट करावीच लागणार, यात लाज वाटायचं काहीच कारण नसल्याते मत सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी व्यक्त केलयं.

सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजपपुरस्कृत अनिरुद्ध ऊर्फ आण्णा कांबळे यांची अध्यक्ष पदी निवड झालीय. अनिरूध्द कांबळे हे गरीब कुटुंबातील असून केम (ता. करमाळा) गावापासून दीड किलोमीटर अंतरावर त्यांची वडिलोपार्जित १५ एकर जिरायत जमीन आहे. ही शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने पाऊस पडला तरच शेती पिकते. अन्यथा दुष्काळाचा सामना करावा लागतो. त्यामुळे अनिरूध्द कांबळे यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय सुरू केला आहे. यातून ते दररोज १० लिटर दूधाचा रतीब गावात देतात. आणि त्यातून येणाऱ्या पैशातून कुटूंबाचा चरितार्थ चालवतात. त्याचबरोबर याच्या सोबतीला गावात राजकारण आणि समाजकारण ही करतात. 

अनिरूध्द कांबळे यांच्या कुटूंबात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी व दोन मुले आहेत. एक मुलगा अकलूज येथे बारावीत तर दुसरा मुलगा केम येथे दहावीत शिकत आहे. तर शेतीला जोडधंदा म्हणून सुरू केलेल्या दुग्धोत्पादनासाठीच्या लहान मोठ्या १४ देशी गाई आहेत. 

गाईगुरांचे चारापाणी,  झाडलोट, धारा काढणे ही सर्व कामे अनिरूध्द कांबळे स्वतः करतात. त्यामुळे ते अध्यक्ष होणार हे कळल्यावर त्यांच्या पत्नी शुभांगी यांना आता आपल्या गाईगुरांचं कसं होणार हा प्रश्न पडला होता. त्यामुळे अनिरूध्द कांबळे यांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झालो तरी यापुढेही गायीगुरांच्या धारा काढून सुरू असलेला माझा घरप्रपंच मी सांभाळेन असे मत व्यक्त केले आहे. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: solapur zp अनिरुद्ध कांबळे