नवी दिल्ली | देशातील अपारंपारिक उर्जा क्षेत्रात चांगली वाढ होत असून सोलर क्षेत्रातील उद्योगधंद्यांची संख्या वाढत आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकार देखील प्रोत्साहन देत आहे. जर आपणास एखादा व्यवसाय करायचा असेल तर आता चांगली संधी असून यातून लाखो रूपयांची कमाई देखील करता येत आहे. सरकारी अनुदानाविषयीची अधिक माहिती MEDA या लिंकवर उपलब्ध होईल.
एका महिन्यात करा एक लाख रुपयांची कमाई
सध्या केंद्र आणि राज्य सरकारचं लक्ष्य सोलर एनर्जीवर निर्मितीवर आहे. याच कारणामुळे सरकार लोकाना सोलर प्लांट बसविण्यास प्रोत्साहन देत आहे. काही राज्यातील औद्योगिक क्षेत्रात सोलर प्लांट बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे यासाठी आवश्यक असणाऱ्या सोलर प्रोडक्टस् विक्रीचा व्यवसाय करण्याची मोठी संधी आहे. यात सोलर पीवी, सोलर थर्मल सिस्टीम, सोलर एटिक फेन, सोलर कूलिंग सिस्टम चा व्यवसाय सुरू करून चांगली कमाई करता येते. साधरणत: ४ ते ५ लाख रुपयांच्या गुंतवणूकीतून हा व्यवसाय सुरू करता येतो. विशेष म्हणजे सोलर एनर्जी संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियासह इतर अनेक बँकांच्या एसएमई शाखेतून कर्ज मिळू शकते. या व्यवसायातून महिन्याला ३० हजार रुपयांपासून १ लाख रुपयांची कमाई होऊ शकते.
सोलरद्वारे चालणाऱ्या प्रोडक्ट्सचा व्यवसायही आपण करू शकता. सध्या अशा अनेक प्रोडक्ट्सना बाजारात चांगली मागणी आहे. देशातील आणि परदेशातील कंपन्या सोलर, मोबाईल चार्जर, सोलर वाटर हीटर, सोलर पंप, सोलर लाईट्स बनवत आहेत. यातील काही प्रोडक्ट्सवर अर्थात वॉटर हीटर, सोलर पंप यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सब्सिडी देखील देते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी १ ते २ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यासाठी बँकेतून कर्जही घेऊ शकता. तर दर महिन्याला २० ते ४० हजार रुपयांची कमाई यातून होऊ शकते.
सोलर मेंटेनेंस आणि क्लिनिंग सेंटर –
सोलर एनर्जीशी संबंधित मेंटेनेंस आणि क्लिनिंग सेंटर सुरू करुन चांगली कमाई करता येते. सोलर पॅनलची काळजी आणि देखभाल जितकी अधिक घेतली जाईल तितकी त्याची उत्पादन क्षमता अधिक होते. क्लिनिंग सेंटर सुरू करून सोलर पॅनल वापरणाऱ्यांना किंवा इंडस्ट्रीजला सर्विस देता येते. मेंटेनेंससह सोलर प्रोडक्ट्स आणि इन्वर्टर्सची दुरुस्ती आणि मेंटेनेंसची कामेही यामाध्यमातून करता येतात. यात गुंतवणूकही कमी आहे. साधारण ५० हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून हा व्यवसाय करता येईल. तर दर महिन्याला १५ ते २० रुपयांची कमाई होऊ शकते.
सोलर कंसल्टंट (सोलर सल्लागार)
सोलर एनर्जीमध्ये सोलर कंसल्टंट म्हणून काम करता येते. सोलर कंसल्टंट बनण्यासाठी आपल्याला सोलर व्यवसायाची तांत्रिक माहिती घ्यावी लागेल. याचे काही कोर्सही आहेत. सोलर प्लांट किंवा पॅनल लावणाऱ्यांची वायबिलिटी, फायदे, नुकसानाची माहिती घ्यावी लागेल. जेणेकरून तुम्ही ग्राहकांना माहिती देऊ शकता. सल्लागार म्हणून काम करताना सोलरच्या साईटवर जाऊन त्याचा अभ्यास करून गुंतवणुकीचा सल्ला द्यावा लागतो. यासाठी आपल्याकडे एक ऑफिस, संकेतस्थळ, (वेबसाईट) यासारख्या काही प्राथमिक गोष्टी असणे गरजेचे आहे. यात गुंतवणूक खूप कमी असून कमाई मात्र ५० हजार किंवा त्यापेक्षा अधिक होऊ शकते.
फायन्सास सल्लागार
जे ग्राहक सोलर प्रोजेक्ट्स किंवा पॅनल बसवू इच्छितात, त्यांना सेवा देण्याचे काम वित्त सल्लागारास करावे लागते. अनेक सरकारी आणि गैर सरकारी कंपन्या सोलर पॅनलसाठी कर्ज उपलब्ध करुन देतात. याची माहिती सर्वसामान्य लोकांना असतेच असे नाही. त्यामुळे फायनान्स सल्लागार म्हणून आपण हे काम करून ग्राहकांना सेवा देऊ शकता. खासगी वित्त संस्थांशी संपर्क करुन ग्राहक आणि वित्त देणाऱ्या संस्थेच्या दरम्यान एक मध्यस्थ म्हणून आपण काम करुन महिन्याला ३० ते ५० हजार रुपयांची कमाई करता येते.