Categories: राजकीय

तूर्तास सोनियांच्याच हाती कॉंग्रेसची धुरा..!

नवी दिल्ली | काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत सोनिया गांधीच काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदी राहणार असल्याचं निश्चित झालं. त्याचबरोबर पुढच्या सहा महिन्यात पक्षाचा नवा अध्यक्ष निवडला जाईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

दरम्यान, या बैठकीपूर्वी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी सोनिया गांधी यांनी पक्षाची धुरा आपल्या हातात घ्यावी, अशी इच्छा व्यक्त केली. तर काहींनी राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष पद सोपवण्यात यावं अशी मागणी केली. यावरून कॉंग्रेसमध्येच दोन गट पडल्याचे पहायला मिळाले. तर काही नेत्यांनी गांधी घराण्याच्या बाहेर अध्यक्षपद देण्याचीही मागणी केली आहे. त्यामुळे सहा महिन्यानंतर नेमकं कोण अध्यक्ष होणार हे पहावं लागणार आहे.

Team Lokshahi News