ST महामंडळात लवकरच 400 चालक पदांची भरती

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून संपाच्या पार्श्वभूमीवर विस्कळीत झालेली एसटी सेवा पूर्ववत करण्यासाठी महामंडळाने सेवानिवृत्त चालक करारपद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतला. यानंतर महामंडळाकडे फक्त ३८९ अर्ज आलेत. त्यामुळे एसटी महामंडळाने आणखी ४०० कंत्राटी चालक खासगी कंपन्यांकडून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. 

अद्यापही ६१ हजार कर्मचारी संपावर असून दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटूनही एसटीचा संप मिटलेला नाही. विलीनीकरणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या संपामुळे एसटी महामंडळाची कोंडी झाली आहे. अद्यापही एसटीचे कर्मचारी परतण्यास अनुत्सुक असून ५० हजार चालक, वाहक संपात आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनीही कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी केलेल्या आवाहनानंतरही प्रतिसाद कमीच मिळत आहे.

एसटी महामंडळातील एकूण कर्मचारी संख्या ८७ हजार ७०५ आहे. यातील ६१ हजार ६७७ कर्मचारी अद्यापही संपात सामील आहेत. यामध्ये चालक, वाहकांचीच संख्या अधिक आहे. २७ हजार ६८६ चालक आणि २२ हजार ८४६ वाहक अद्यापही कामावर नाहीत. तर उर्वरित अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये कार्यशाळा व अन्य कार्यालयीन कर्मचारी आहेत. फक्त २६ हजार २८ कर्मचारीच उपस्थित असून यामध्ये चालक, वाहकांची संख्या कमी आहे.

सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळवण्यासाठी आजच जॉईन करा WorkMore टेलिग्राम, आणि व्हाटस् अप ग्रुप व मिळवा दररोज नवनव्या नोकरींची मोफत माहिती…(Join होण्यासाठी WorkMore(T), WorkMore (W)या लाल रंगाच्या लिंकवर क्लिक करा)