मुंबई | राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यातल्या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. एकूण ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कोकण बोर्डाची टक्केवारी सर्वाधिक आहे.
दहावीच्या परीक्षेला नोंदणी केलेले एकूण विद्यार्थी १७ लाख ६५ हजार ८९८ होते. यापैकी १७ लाख ९ हजार २६४ विद्यार्थी परिक्षेला बसले, तर यातील १५ लाख १ हजार १०५ विद्यार्थी उत्तिर्ण झालेत.
या ठिकाणी पहा निकाल
पुढीलपैकी कोणत्याही एका वेबसाइटवर निकाल पाहू शकाल –
www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.
www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
गुणपडताळणी / छायाप्रती / पुनर्मूल्यांकन
ऑनलाइन निकालानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांना श्रेणीव्यतिरिक्त कोणत्याही अनिवार्य विषयांची गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. यासाठी विद्यार्थी-पालकांना http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर स्वत: किंवा शाळेमार्फत अर्ज करता येऊ शकेल. यासाठी आवश्यक अटी व सूचना संकेतस्थळावर दिल्या आहेत. या प्रक्रियांसाठी शुल्कदेखील ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे.
महत्त्वाच्या तारखा –
गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत – ३० जुलै २०२० ते ८ ऑगस्ट २०२०
छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत – ३० जुलै २०२० ते १८ ऑगस्ट २०२०
राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातून १७ लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुळे या परीक्षेचा निकाल रखडला होता.
या संकेतस्थळांवर पाहता येणार निकाल –
www.maharesult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com