कोल्हापूर | करवीर तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही बाब लक्षात घेता, हातकणंगले तालुक्यातील संजय घोडावत कॉलेजमध्ये सुरु असलेल्या डेडीकेटेड हेल्थ केअर सेंटरच्या धर्तीवर करवीर तालुक्यात सुध्दा अशा पद्धतीचे डेडीकेटेड हेल्थ केअर सेंटर सुरु करण्यात यावे. अशा मागणीचे निवेदन करवीर तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आले. यावेळी करवीर तालुका भारतीय जनता पार्टी अध्यक्ष हंबिरराव पाटील (आप्पा), सहकारसेल जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील (काका), युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विशाल पाटील, दिव्यांग आघाडी जिल्हाध्यक्ष गजानन सुभेदार, तालुका उपाध्यक्ष सत्वशिल पाटील, तालुका सरचिटणीस संजय देवणे व सतिश पाटील हे उपस्थित होते.