मुंबई | किसान क्रेडीट कार्डधारकांसाठी एसबीआय ने एक ऑफर आणली आहे. यामुळे किसान क्रेडिट कार्डधारक शेतकरी आपल्या क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवू शकतील. स्टेट बँकेने आपल्या योनो कृषीवर किसान क्रेडिट कार्डवरील समीक्षा नावाची एक सुविधा सुरु केली आहे. याच्यामार्फत शेतकरी आपल्या किसान क्रेडिट कार्डची मर्यादा घरबसल्या वाढवू किंवा कमी करु शकतील. यासाठी बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही. एसबीआयकडून सांगण्यात आले आहे की, योनो कृषीवर केसीसीचा समीक्षा पर्याय निवडा. दरम्यान मर्यादा वाढविण्याची प्रक्रिया ही फक्त ४ क्लिकने पुर्ण करता येते.
SBI बॅंकेच्या या अधिकृत वेबसाईटवरील SBI AGRICULTURE लिंकवर क्लिक करून किसान क्रेडीट कार्डसंदर्भात सर्व माहिती घेता येईल तसेच अर्जही भरता येईल.
किसान क्रेडीट कार्डची वैशिष्ट्ये
सर्व केसीसी कर्जासाठी अधिसूचित पीक किंवा अधिसूचित क्षेत्र, पीक विमाच्या अंतर्गत कवर केले जातात. पहिल्या वर्षाच्या कर्जाची रक्कम कृषी खर्च, कापणीनंतरचे खर्च आणि शेतीतील जमीन देखभाल खर्चाच्या आधारे ठरविली जाते. केसीसीच्या ६० लाख रुपयांपर्यंतच्या मर्यादेसाठी दुय्यम सुरक्षा आवश्यक नाही.