Categories: अर्थ/उद्योग

Yes Bank ची बुडती नौका SBI सावरणार, गुंतवणुकदारांना दिलासा

मुंबई। येस बॅंकेतील गुंतवणुकदारांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशातील नंबर एकची मोठी बॅंक असणाऱ्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने येस बॅंकेत २ हजार ४५० कोटी रूपये गुंतवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे येस बॅंकेचा ४९ टक्के मालकी हिस्सा एसबीआयच्या ताब्यात जाणार आहे. SBI च्या या निर्णयामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर दुसरीकडे रिझर्व्ह बँकेनं येस बँकेवर सीईओ आणि तीन संचालक नेमले आहेत. तसंच गुंतवणूकदारांना आपले दोन प्रतिनिधी नेमता येणार आहेत.

येस बॅंकेच्या या प्रकरणामुळे रिझर्व्ह बँकेच्या अकार्यक्षम देखरेख यंत्रणेचं पितळ पुन्हा एकदा उघडं पडलंय. येस बँकेची आर्थिक स्थिती ढासळत असूनही, थकीत कर्जाचा आकडा वाढत असूनही बँकेतून कर्जवाटपाचा ओघ सातत्याने सुरु होता. वास्तविक परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता दिसल्यावर रिझर्व्ह बँकेनं पावलं उचलणं अपेक्षित होतं. पण तसं झालं नाही. त्यामुळे येस बॅंकला अखेर घरघर लागल्याचे स्पष्ट झाले. साधारण १५ महिन्यांपूर्वी रिझर्व्ह बँकेनं पहिल्यांदा अवाजवी कर्जवाटपाची दखल घेऊन येस बँकेचे सीएमडी राणा कपूर यांना पदावरुन दूर करण्याचे आदेश दिले. पण तोवर जवळपास २लाख ४४ हजार कोटींचं कर्जवाटप झालं होतं. 

दरम्यान, नव्या येस बँकेची मालकी मिळण्यासाठी नव्या गुंतवणूकदाराला अंदाजे अडीच हजार कोटींची गुंतवणूक करावी लागणार आहे. या गुंतवणूकीपैकी साधारण १४०० कोटी रुपये तीन वर्ष काढता येणार नाहीत. त्यामुळे या निकषांवरही साऱ्यांचं लक्ष असणार आहे. या सर्व प्रकरणात रिझर्व्ह बँक सीईओ आणि तीन स्वतंत्र संचालकांची नेमणूक करेल. तर, गुंतवणूकदाराला आपले दोन प्रतिनिधी नेमता येणार आहेत. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Insurance sector sate bank of india SBI share market yes bank corporate yes bank credit card yes bank customer care yes bank moneycontrol yes bank near me yes bank news yes bank share price target yes bank wiki