Categories: Featured कला/संस्कृती

‘जागर वक्तृत्वाचा’ राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन..!

गगनबावडा। लॉकडाऊनमुळे लोकांचे सोशल मिडीया वापरण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. सध्याच्या परिस्थीतीत घरबसल्या आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी अनेकजण धडपडत आहे. ही बाब ध्यानात घेत गगनबावडा येथील ‘यशवंतराव पाध्ये शैक्षणिक सांस्कृतिक धर्मादाय संस्था गगनबावडा’ आणि ‘श्री नंदिकेश्र्वर मशिनरी, इंदापूर’ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय जागर वक्तृत्वाचा ऑनलाईन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. 

लॉकडाऊनमध्ये घरबसल्या आपल्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आम्ही ही स्पर्धा आयोजित केली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात दडलेले वक्तृत्व कलागुण यामुळे सर्वांना अनुभवण्याची संधी मिळणार असल्याचे आयोजक वैदेही पाध्ये यांनी यानिमित्ताने सांगितलय. तरी सर्वांनी ‘जागर वक्तृत्वाचा’ या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेऊन आपले विचार मांडावेत असे आवाहनही त्यांनी केलयं. 

  • जागर वक्तृत्वाचा या फेसबुक पेजला भेट द्या.
  • स्पर्धकांनी आपले व्हीडीओ या नंबरवर व्ह़ॉटस् अप करावेत.
  • वैदेही श्रीकृष्ण पाध्ये – 9763203557, अमित भारत लाळगे – 9527659999.

यासाठी स्वतंत्र असे फेसबुक पेज तयार करण्यात आले असून यावर स्पर्धकांचे व्हीडीओ अपलोड केले जात आहेत. स्पर्धेची घोषणा करण्यात आल्यापासूनच यासाठी उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला असून स्पर्धकांनी ३१ मे पर्यंत आपले व्हीडीओ ऑनलाईन सबमिट करण्यास सांगितले आहे. स्पर्धकांच्या मागणीचा विचार करून आपण वोटिंग लाईन ची मुदत वाढीव देत आहोत. परंतु आपले व्हिडिओ हे ३१ मे पर्यंत स्वीकारू त्यात बदल नाही. आपले वोटिंग लाईन ५ जून पर्यंत वाढीव आहेत. ५ जून ला सकाळी ९ वाजेपर्यंत आलेले मत ग्राह्य धरण्यात येईल, त्या नंतर आलेले येणारे मत ग्राह्य धरले जाणार नाही. ६ जून रोजी सायंकाळी निकाल जाहीर केला जाईल. त्यानंतर बक्षीस वितरण प्रक्रिये बाबत विजयी स्पर्धकांसोबत संवाद केला जाईल. आपल्याला मिळालेल्या वाढीव वेळेचा आपण योग्य तो उपयोग करून घ्याल ही अपेक्षा.

स्पर्धेचा निकाल ६ जून रोजी सायंकाळी ५ वाजता ऑनलाईन जाहीर केला जाणार असून प्रथम पारितोषिक १५०१ रूपये, प्रमाणपत्र आणि भेटवस्तू, व्दितीय पारितोषिक १००१ रूपये, प्रमाणपत्र आणि भेटवस्तू, तृतीय पारितोषिक ५०१ रूपये, प्रमाणपत्र आणि भेटवस्तू, तर उत्तेजनार्थ प्रथम, व्दितीयसाठी प्रमाणपत्र आणि भेटवस्तू दिली जाणार आहे. स्पर्धेचे विषय खालीलप्रमाणे

  • स्त्री सुरक्षा – कौटूंबिक व सामाजिक
  • वाचन एक संस्कार
  • सोशल मिडीया प्रबोधन की मोहजाल
  • आजचे राजकारण तरूणाईसाठी दशा की दिशा
  • मराठी तरूण आणि व्यवसाय

संयोजन समिती – वैष्णवी पाध्ये, सांकेत मोरे, इंद्रजीत मोरे, अवधूत गुरव, ओंकार जाधव

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: jagar vaktrutvacha