Categories: महिला सामाजिक

गगनबावड्याच्या वैदेही पाध्ये यांना राज्यस्तरीय युथ आयडॉल पुरस्कार जाहीर

गगनबावडा | मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी आयोजित राज्यस्तरीय गुणिजन गौरव महापरिषद २०२१ चा “राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्कार २०२१”, गगनबावडा तालुक्यातील कु. वैदेही पाध्ये यांना जाहीर झाला आहे. ‘पुरस्कार प्रेरणा देतात आणि प्रेरणेने राष्ट्र मोठे होते’ असा उदात्त हेतू ठेवून लोकसेवा अकादमी दर वर्षी अशा स्वरूपाचे पुरस्कार प्रदान करते.

वैदेही पाध्ये या विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असून यापूर्वीही त्यांना विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. वैदेही पाध्ये यांना “राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्कार २०२१” जाहीर झाल्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

“हा पुरस्कार नक्कीच माझ्या कडून अनेक सत्कर्म करुन घेईल अशी आशा आहे, मला मिळालेला ‘राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्कार २०२१’ मी माझ्यावर प्रेम करणाऱ्या तुम्हा सर्वांना देऊ करते”.
– कु. वैदेही पाध्ये

पुरस्कार वितरण सोहळा नाशिक, पुणे, मुंबई या विविध ठिकाणी पार पडणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप आकर्षक सन्मान चिन्ह, लक्षवेधी गौरवपदक, विशेष महावस्त्र, खास मानपत्र, मानकरी बॅच, मानाचा फेटा असे आहे. 

Team Lokshahi News