supreme-court-maratha aarakshan
नवीदिल्ली। सरकारी रुग्णालय असो की खासगी मान्यताप्राप्त सर्व प्रयोगशाळांमध्ये कोरोनाची चाचणी निशुल्क म्हणजेच मोफत करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला याची अंमलबजावणी करण्यासाठी रुग्णालयांना योग्य दिशानिर्देश देण्याचीही सुचना केली आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या मागास घटकांच्या कोरोना निदान चाचणीतील मोठा अडसर दूर झाल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.
न्यायमूर्ती अशोक भूषण आणि एस. रविंद्र भट यांच्या खंडपीठाने कोरोना चाचणीवरील हा महत्वाचा आदेश दिला आहे. हा आदेश देताना न्यायालयाने काही निर्देशही दिले आहेत.
दरम्यान, याआधी केंद्र सरकारने खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोना चाचणी करण्यासाठी ४५०० रुपयांचं शुल्क निश्चित केलं होतं. मात्र, शशांक देव सुधी यांनी या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. यावर सुनावणी करताना न्यायालयाने हे आदेश दिले.