Categories: Featured

सुशांतसिंग राजपूतचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला; वाचा काय आहे मृत्युचं नेमक कारण?

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचा शवविच्छेदन अहवाल (Postmortem Report) काही वेळापूर्वीच आला आहे. या अहवालात त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान, सुशांतच्या कुटुंबीयांनी असा दावा केला होता की, तो आत्महत्या करू शकत नाही. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये गळफास घेऊन मृत्यू झालाचं स्पष्ट सांगण्यात आलं आहे.

३४ वर्षीय अभिनेता सुशांत सिंग राजपूतने रविवारी वांद्रे येथील घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याच्या मृत्यूच्या बातमीने चाहते आणि संपूर्ण मनोरंजन विश्वाला हादरा बसला होता. सुशांतसारखा अभिनेता असे पाऊल उचलू शकतो यावर सुरुवातीला कोणाचाही विश्वास बसत नव्हता. अनेकांना सुरवातीला ही फेक न्यूज वाटत होती. मात्र काही वेळातच सुशांतने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.

सुशांतसिंग राजपूतने जेव्हा गळफास घेतला त्यावेळी घरात चार लोक होते. दरम्यान, सुशांतच्या कुटुंबीयांचा असा दावा आहे की, तो आत्महत्या करू शकत नाही. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये गळफास घेऊन मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे. त्याचे पोस्टमॉर्टम मुंबईच्या जुहू येथील कूपर रुग्णालयात झाले. तसेच त्याच्या शरीरातील महत्त्वाचे अवयव जे.जे. रुग्णालये पाठविण्यात आले आहेत. सुशांतच्या शरीरात विष होते का? हे या अवयवांची तपासणी केल्यावर स्पष्ट होईल.

कोरोना चाचणीसाठी नमुना घेतला

या संपूर्ण घटनेत कोरोनाचा उल्लेख नसला तरी खबरदारी म्हणून पोस्टमॉर्टेम करण्यापूर्वी त्याचे स्वॅब नमुनेही घेण्यात आले आहेत. यावरुन सुशांतसिंग राजपूतची कोरोना  तपासणी देखील होणार आहे. तो कोरोना पॉझिटिव्ह तर नव्हता ना हे देखील यावेळी पाहिलं जाणार आहे. हा अहवाल लवकरच येईल.

This post was last modified on June 15, 2020 2:59 PM

Team Lokshahi News

Recent Posts

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ खात्यात करावा लागेल अर्ज…

मुंबई | राज्यातील आयटीआय पात्रता धारकांना सरकारी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली असून ऊर्जा विभागाच्या… Read More

October 23, 2020

कोल्हापूर गगनबावडा मार्गावर भीषण अपघात; कोल्हापूरातील चार जण ठार

एसटी बस इनोव्हा कार ची समोरासमोर जोरदार धडक, मयत कोल्हापूरातील कोपार्डे | कोल्हापूर गगनबावडा मार्गावर… Read More

October 23, 2020

अतिवृष्टी, पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

मुंबई | राज्यात जून ते ऑक्टोबर २०२० या काळात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी… Read More

October 23, 2020

भाजपमधील ‘या’ नेत्यांच्या सल्ल्यानेच मी राष्ट्रवादीत – एकनाथ खडसे

मुंबई | गेली ४० वर्षे भाजपसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर… Read More

October 23, 2020

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी खासदार संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंकडे केल्यात ‘या’ महत्वाच्या मागण्या

मुंबई | महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्याची मागणी खासदार संभाजीराजे यांनी… Read More

October 23, 2020

हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार – वनमंत्री संजय राठोड

कोल्हापूर | हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार असल्याची ग्वाही वनमंत्री संजय राठोड यांनी… Read More

October 22, 2020