Categories: Featured

“अंधुक भूतकाळ अश्रूवाटे ओघळतोय #आई” – सुशांतसिंगची अखेरची इन्स्टाग्राम पोस्ट!

मुंबई | “अंधुक झालेला भूतकाळ अश्रूवाटे ओघळत आहे. न संपणारी स्वप्नं हास्याची लकेर निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.. पण क्षणभंगुर आयुष्य… या दोघांशी वाटाघाटी करतोय, #आई”, अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट सुशांतने तीन जूनला केली होती, ती त्याची अखेरची पोस्ट ठरली. आपल्या अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेला बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली आहे. त्यानंतर त्याची ही पोस्ट चर्चेत आलीय.

View this post on Instagram

Blurred past evaporating from teardrops Unending dreams carving an arc of smile And a fleeting life, negotiating between the two… #माँ ❤️

A post shared by Sushant Singh Rajput (@sushantsinghrajput) on Jun 3, 2020 at 5:43am PDT

सुशांतचा जन्म पाटण्याचा. त्याची बहीण मितू सिंह ही राज्यस्तरीय क्रिकेटपटू. 2002 मध्ये सुशांतच्या आईचं निधन झालं होतं. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी सुशांतने आईला गमावलं. कोवळ्या वयात बसलेल्या या धक्क्याचा मोठा आघात त्याच्या मनावर झाला होता. सुशांत आईच्या बाबतीत अत्यंत हळवा होता.

“जरा नचके दिखा” या रिअॅलिटी शोमध्ये सुशांतच्या सहस्पर्धकांनी ‘मदर्स डे’च्या निमित्ताने त्याच्या आईला समर्पित परफॉर्मन्स दिला होता. तर “झलक दिखला जा”मध्ये आईसाठी केलेल्या डान्सनंतर हळवा झालेला सुशांत सर्वांनी पाहिला आहे.

Team Lokshahi News