Categories: Featured अर्थ/उद्योग

१० हजार रूपयांच्या गुंतवणुकीवर कसे मिळवाल महिना ८५ हजार… जाणून घ्या ही योजना

नवी दिल्ली। जर तुम्ही काही दिवसांनी फारसं काम न करता पैसे कमवायचा विचार करत असाल तर म्युच्युअल फंडाच्या(Mutual Funds)एका खास योजनेत पैसे गुंतवून भरपूर कमाई करू शकता. यासाठी तुम्हाला १५ वर्षांचा एका सिस्टिमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅनमध्ये (SIP) गुंतवणूक करावी लागेल. तज्ज्ञांच्या मते, म्युच्युअल फंडाच्या SIP मध्ये दर महिन्याला १० हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर दरवर्षी SIP मध्ये २ हजार रुपये वाढवावे लागतील. यावर वर्षाला १२ टक्के रिटर्न्स मिळाले तर १५ वर्षांत तुमच्या पैशांची किंमत तब्बल ९५ लाख रुपये होईल.

हे पैसे तुम्ही सिस्टिमॅटिक विथड्रॉअल प्लॅन (SWP ) मध्ये गुंतवू शकता. या योजनेत ९ टक्के रिटर्न्सच्या हिशोबाने दर महिन्याला एक ठरलेली रक्कम तुमच्या खात्यात येत राहील. जर तुम्ही ९५ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर ९ टक्के रिटर्न्सच्या हिशोबाने तुम्हाला दर महिन्याला ८० ते ८५ हजार रुपये मिळत राहतील अर्थात वर्षाला किमान १० लाख रूपयांचा परतावा होईल.

SWP अर्थात सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लॅन हा SIP सारखाच असून यामधून तुम्ही एका ठराविक पद्धतीने पैसे काढू शकता. SWP मधून दर महिन्याला तुम्ही पैसे काढू शकता. तसेच तुम्हाला मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक स्तरावर देखील पैसे काढता येतात. हे पैसे तुमच्या खात्यात येतील आणि ठराविक काळानंतर तुम्ही पैसे काढू शकाल.

ही योजना निवृत्तीनंतरच्या आयुष्यातील खर्चासाठी खूप फायदेशिर आहे. निवृत्तीनंतर डेट फंड्सचा पोर्टफोलिओ चांगला असतो. महिन्याच्या खर्चासाठी तुम्ही अल्ट्रा शॉर्ट टर्म फंडमध्ये गुंतवणूक करू शकता. SWP च्या माध्यमातून मासिक स्वरूपात परतावा मिळू शकत असल्याने ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगली आहे.

Team Lokshahi News